भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी मंदाकिनी खडसे यांना दिलासा, अंतरिम जामीन मंजूर

Bhosari land scam | ईडीचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी मंदिकिनी खडसे यांच्या जामिनाला विरोध केला होता. त्यामुळे दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी मंदाकिनी यांचा नियमित जामिनाचा अर्ज निकाली काढला जाईपर्यंत त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Bhosari plot scam case High Court grants relief to Mandakini Khadse till 25th april
भोसरी भूखंड घोटाळा प्रकरण : मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा, २५ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण

पुणे – पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना पुन्हा एकदा न्यायालयाने दिलासा दिला आहे. पीएमएलए कोर्टाने १ लाखांच्या जातमुचकल्यावर त्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र, त्यांना देश सोडून जाण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत.

हेही वाचा – भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना दिलासा

मंदिकिनी खडसे यांनी अंतरिम जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात दाद मागावी अशा सूचना उच्च न्यायालयाने दिल्या होत्या. त्यानुसार, कलम ८८ अन्वये सत्र न्यायालायत मंदाकिनी खडसे यांनी अंतरिम जामिनासाठी अर्ज केला. अॅड. मोहन टेकावडे यांनी मंदिकिनी खडसे यांच्या बाजूने युक्तीवाद केला आहे. मंदाकिनी खडसे या तपासादरम्यान योग्य सहकार्य करत आहे. त्यांनी आतापर्यंत १५ वेळा ईडीच्या कार्यालयात हजेरी लावून कागदपत्रेही सादर केली आहेत, असं अॅड. टेकावडे यांनी सांगितलं.

दरम्यान, ईडीचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी मंदिकिनी खडसे यांच्या जामिनाला विरोध केला होता. त्यामुळे दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी मंदाकिनी यांचा नियमित जामिनाचा अर्ज निकाली काढला जाईपर्यंत त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा यंदाच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी चांगली तरतूद असेल; मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

निर्बंध काय?

मंदाकिनी खडसे यांना अंतरिम जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांच्यावर काही निर्बंधही लादले आहेत. जामीन कालावधीत मंदाकिनी यांनी पुराव्यांमध्ये कुठलीही छे़डछाड करू नये. देश सोडून जाऊन नये. इडीचे अधिकारी चौकशीसाठी बोलावतील तेव्हा यंत्रणेपुढे हजर राहावे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हापासून त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकनाथ खडसे २०१६ मध्ये महसूल मंत्री होते. तेव्हा भोसरी जमीन प्रकरणात मनी लॉन्ड्रिग झाल्याचा आरोप केला जातोय. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत याची चौकशी झाली होती, मात्र तेव्हा त्यांना क्लीन चीट मिळाली होती.