घरताज्या घडामोडीअजून 25 वर्षे माजी रहाव लागेल, चंद्रकांत पाटलांना निरोप पाठवला - संजय...

अजून 25 वर्षे माजी रहाव लागेल, चंद्रकांत पाटलांना निरोप पाठवला – संजय राऊत

Subscribe

चंद्रकांतदादा पाटील हे आमचे मित्र आहेत. जुने साथीदार आहेत. मला माजी मंत्री म्हणून नका, ही त्यांची वेदना समजू शकतो. त्यांनी दोन तीन दिवस थांबा बोललेले मी एकले. पण मी चंद्रकांतदादांना निरोप पाठवला आहे की, तुम्हाला येत्या २५ वर्षे माजी म्हणून रहावे लागेल. उद्धवजींच्या नेतृत्त्वात आगामी २५ वर्षे सत्तेत राहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला आगामी २५ वर्षे माजी म्हणून रहावे लागेल असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील यांची नेमणूक नागालॅंडची राज्यपाल म्हणून होत आहे असे मला कळाले. त्यामुळे नागालॅंडचे राज्यपाल म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी येणार असल्यानेच कदाचित त्यांनी असे वक्तव्य केले असावे असाही टोला राऊतांनी लगावला. नागालॅंडचे राज्यपाल होण्याची ऑफर चंद्रकांत पाटील यांनी आली असल्याचे कळाले आहे, असेही राऊतांनी यावेळी सांगितले.

किती काळ माजी रहायचे हीदेखील वेदनाच 

राजकारणात आम्ही एकमेकांविरोधात टीका करत असलो तरीही चंद्रकांत पाटील हे आमचे मित्र आहेत. त्यांची वेदना आम्ही समजू शकतो. माजी म्हणण्याची वेदना असते. किती काळ माजी रहायचे हीदेखील वेदना असते. म्हणूनच मी त्यांना निरोप पाठवला आहे की तुम्हाला २५ वर्षे किमान माजी रहावे लागले. उद्धवजींच्या नेतृत्वात आम्ही हे सरकार किमान २५ वर्षे चालवू. त्यामुळे तुम्ही मनाची तयारी करा, की तुम्हाला २५ वर्षे माजी रहावे लागेल. माजी हे स्वप्न बघण्यासाठी अजुनही कोणताही टॅक्स लागलेला नाही किंवा जीएसटी लावलेला नाही.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील यांची राज्यपाल म्हणून नागालॅंडमध्ये नेमणूक करण्यासाठी त्यांना विचारणा करण्यात आली आहे. नागालॅंडचे राज्यपाल म्हणून ते जबाबदारी स्विकारत असतील म्हणून ते मला माजी म्हणू नका म्हटले असतील. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असेही राऊतांनी सांगितले.


हेही वाचा – मला माजी मंत्री म्हणू नका, एक-दोन दिवसांत कळेल

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -