Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची प्रकृती बिघडली

माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची प्रकृती बिघडली

वायुदलाच्या विशेष विमानाने डॉ. भामरे यांना धुळे येथून मुंबईत हलवण्यात आले

Related Story

- Advertisement -

डेंग्यू आणि चिकनगुणियामुळे माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना प्रकृती बिघडल्याने त्यांना वायुदलाच्या विशेष विमानाने धुळे येथून मुंबईत हलवण्यात आले. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोनवरुन डॉ. भामरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

नाशिकचा काही भाग आणि धुळे जिल्ह्याचा काही भाग अशा संयुक्त मतदार संघातून भाजपच्या वतीने डॉ. सुभाष भामरे तर काँग्रेसकडून कुणाल पाटील यांना खासदारकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. त्यात डॉ. भामरे यांनी कुणाल पाटील यांचा पराभव कर विजय मिळवला. दरम्यान, कुणाल पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी केली आणि आमदार म्हणून ते निवडून आले.

- Advertisement -