घर महाराष्ट्र नक्की कुणावर हसावे व कुणावर चिडावे..., ठाकरे गटाची काका-पुतण्या भेटीवर प्रतिक्रिया

नक्की कुणावर हसावे व कुणावर चिडावे…, ठाकरे गटाची काका-पुतण्या भेटीवर प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अनेकदा परखड विधाने करतात. त्यातही बऱ्याचदा गंमत असते. ‘‘महाराष्ट्रातील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे. राज्यातील सरकार हे ‘गंमत जंमत’ सरकार आहे, असे नाना पटोले यांनी यापूर्वी म्हटले आहे. नाना पटोले यांच्या या वक्तव्याशी आम्ही सहमत आहोत, पण त्यात थोडी भर टाकून सांगतो, पवार काका-पुतण्यांच्या अलीकडच्या भेटीचा प्रकारसुद्धा गंमत जंमत ठरत आहे. नक्की कुणावर हसावे व कुणावर चिडावे, हे महाराष्ट्राला कळेनासे झालेय, अशी कोपरखळी ठाकरे गटाने लगावली आहे.

हेही वाचा – Sharad Pawar : अजित पवारांना…; शरद पवार यांनी सांगितलं भेटीमागचं कारण

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीस वारंवार जात आहेत व शरद पवार या भेटी टाळत नाहीत, हे गमतीचे आहे. ‘‘अजित पवार हे ‘मविआ’त परत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. अजितदादांना उपरती झाली असेल म्हणून ते शरद पवारांना भेटले असतील’’, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. पण त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. असा संभ्रम निर्माण व्हावा यासाठीच भाजपाचे देशी चाणक्य अजित पवारांना अशा भेटीसाठी ढकलून पाठवतायत काय? या शंकेला बळ मिळत आहे. शरद पवार यांची प्रतिमा अशा भेटीने मलिन होते व ते बरे नाही, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा – शरद पवार-अजित पवार भेटीसंदर्भात जयंत पाटलांनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले…

- Advertisement -

अर्थात अजित पवारांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीने संभ्रम होईल, वाढेल यापलीकडे जनतेची मने पोहोचली आहेत. या रोजच्या खेळाने मनास एक प्रकारची बधिरता आली आहे व त्यास सध्याचे राजकारण जबाबदार आहे, असेही या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

अजित पवार वारंवार शरद पवारांना भेटतात हा एक साथीचा आजार आहे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडून वारंवार विश्रांतीसाठी साताऱ्यातील शेतावर हेलिकॉप्टरने उतरतात हा महाराष्ट्रास लागलेला मानसिक आजार आहे. या दोन्ही आजारांत गुप्त असे काहीच राहिलेले नाही. राजकारणातील डिजिटल युगात गुप्त राहील, असे काहीच नाही, असे सांगत,
दोन पवारांची ‘गंमतभेट’ व मुख्यमंत्र्यांचा वाढता आजार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. महाराष्ट्र म्हणजे ‘गंमत जंमत’ नाही, असे ठाकरे गटाने बजावले आहे.

- Advertisment -