घरताज्या घडामोडीविद्यापीठाच्या परीक्षा वेळेत होणार; वेळापत्रक जैसे थे

विद्यापीठाच्या परीक्षा वेळेत होणार; वेळापत्रक जैसे थे

Subscribe

२३ मार्चपासून सुरू होणार्‍या मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहे.

करोनामुळे ३१ मार्चपर्यंत शाळा, कॉलेजांना सुट्ट्या जाहीर केल्या असल्या तरी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे २३ मार्चपासून सुरू होणार्‍या मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहे. तृतीय वर्ष बीकॉम सत्र ६ च्या परीक्षेने या सत्रास प्रारंभ होत असून, या परीक्षेला ६० हजारापेक्षा जास्त विद्यार्थी बसले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या सत्राला २३ मार्चपासून सुरुवात होत आहे. परंतु राज्यात पसरत असलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत होती. मात्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाकडून सर्व संलग्नित कॉलेजांच्या पदवी स्तरावरील प्रथम व द्वितीय वर्षाच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असल्याने मार्चमध्ये होणार्‍या तृतीय वर्ष बीकॉम सत्र ६ च्या परीक्षेसाठीची विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे कॉलेजच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत. विद्यार्थ्यांनी कॉलेजमधून प्रवेशपत्रे घेण्यात यावीत. तसेच ज्यांना प्रवेशपत्रे विविध प्रशासकीय कारणास्तव उपलब्ध झाली नसतील. त्यांनी कॉलेजकडे चौकशी करावी, अशा सूचनाही विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

उन्हाळी सत्राच्या परीक्षा

विद्याशाखा                         परीक्षा संख्या
मानव्य विद्याशाखा                 ९५
वाणिज्य व व्यवस्थापन             १०१
विज्ञान व तंत्रज्ञान                   ३८१
आंतरविद्याशाखीय अभ्यास         १८२
एकूण परीक्षा                       ७५९

उन्हाळी सत्रामध्ये विद्यापीठ चार विद्याशाखेमधून ७५० पेक्षा जास्त परीक्षा घेत असून, या परीक्षा २३ मार्चपासून २ जूनपर्यंत चालणार आहेत. या उन्हाळी सत्राच्या परीक्षेसाठी विद्यापीठाचा परीक्षा विभाग सज्ज झाला आहे.

– डॉ. विनोद पाटील, संचालक, परीक्षा व मूल्यमापन

उन्हाळी सत्राच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या पुढील करियरच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व कॉलेजांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. पालक व विद्यार्थ्यांनी देखील याबाबत दक्षता घ्यावी.
– डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -