घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रExclusive : नाशिक शासकीय जिल्हा रुग्णालयात 'मृत' घोषित केलेला रुग्ण झाला 'जिवंत'

Exclusive : नाशिक शासकीय जिल्हा रुग्णालयात ‘मृत’ घोषित केलेला रुग्ण झाला ‘जिवंत’

Subscribe

नाशिक : डॉक्टरांनी मृत घोषित केलेला जळीत रुग्ण एकदा नव्हे तर दोनदा जिवंत असल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल) मध्ये गुरुवारी (दि.२५) सकाळी घडली. मृत रुग्ण जिवंत झाल्याने नातेवाईकांनी संतप्त होत डॉक्टरांना विचारणा केली असता, ईसीजीमध्ये सरळ रेष आली आणि संबंधित डॉक्टरांनी लगेच रुग्णाला मृत घोषित केल्याने हा प्रकार घडल्याचे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. या संपूर्ण प्रकारामुळे नातेवाईकांना मात्र दिवसभर मनस्ताप सहन करावा लागला.

नितीन सुरेश मोरे (वय ४१, रा. मोरेवाडा, अशोकस्तंभ, नाशिक) असे रुग्णाचे नाव आहे. पोलीस व डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन मोरे यांनी सोमवारी (दि.२२) अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले होते. त्यात ते ९३ टक्के जखमी झाले. त्यांना उपचारार्थ कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालयातील जळीत कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू होते. व्हेंटिलेटरव्दारे कृत्रिम ऑक्सिजन व सलाईनव्दारे औषधे देवून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा रुग्णालयात कार्यरत मेडिकल कॉलेज डॉक्टरांच्या देखरेखीखाली २४ तास आहेत. गुरुवारी (दि.२५) सकाळी 6.53 वाजता मोरे यांच्या हृदयाचे ठोके बंद झाले. त्यामुळे डॉक्टरांनी तात्काळ ईसीजी तपासणी केली. त्यावेळी सरळ रेष आल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही बाब कुटुंबियांना समजताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

- Advertisement -

दरम्यान, सकाळच्या ड्युटीला दुसरे डॉक्टर 8.15 वाजता आले. त्यांनी नेहमीप्रमाणे रुग्णाची तपासणी केली. त्यावेळी मोरे यांच्या पायाची हालचाल दिसली. ही बाब त्यांनी तात्काळ इतर डॉक्टरांना सांगितली. डॉक्टरांनी तात्काळ व्हेंटिलेटर व सलाईन पूर्ववत सुरू असल्याची शहानिशा केली. शिवाय, परत ईसीजी तपासणी केली असता रेष खाली-वर दिसली. त्यातून ते जिवंत असल्याचे सिद्ध झाले. रुग्ण जिवंत असल्याचे समजताच कुटुंबियांना धक्का बसला. मोरे जिवंत असल्याने डॉक्टर व नातेवाईकांमध्ये चमत्कार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, सकाळी 9.30 वाजता मोरे यांची पुन्हा हालचाल बंद झाली. डॉक्टरांनी तात्काळ ईसीजी तपासणी केली असता त्यात सरळ आली. डॉक्टरांनी हृदयाच्या ठोक्यांची तपासणी केली असता ती जाणवली नाही. त्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू करताच रुग्णाची पुन्हा हालचाल झाली. दोनदा रुग्ण मृत झाला व पुन्हा जिवंत झाल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांवर आरोप करण्यास सुरुवात केली. शेवटी, मेडिकल कॉलेजचे डॉ. गोपाळ शिंदे यांनी नातेवाईकांना सत्य परिस्थिती समजावून सांगितली. नितीन मोरे यांना वेळेत उपचार मिळण्यासाठी डॉ. अभिनंदन जाधव, डॉ. गणेश चौधरी, प्लास्टिक सर्जन डॉ. नीलेश पाटील अहोरात्र उपचार करत आहेत.

डॉक्टरांनी रुग्णास मृत घोषित केले तरी दोन तास व्हेंटिलेटर व सलाईनव्दारे औषधे सुरू होती. दोन तासांनी ड्युटीवर आलेल्या दुसर्‍या डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे तपासणी केली असता रुग्ण जिवंत असल्याचे समोर आले. रुग्ण ९३ टक्के जळाल्याने पुढील २४ तास महत्वाचे आहेत. रुग्णाला तात्काळ उपचार मिळण्यासाठी डॉक्टरांचे पथक कार्यरत आहे. : डॉ. गोपाळ शिंदे मेडिकल कॉलेज, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -