घरमहाराष्ट्रकोणाच्याही चिथावणीला बळी पडू नका व्यापार्‍यांकडून सहकार्याची अपेक्षा

कोणाच्याही चिथावणीला बळी पडू नका व्यापार्‍यांकडून सहकार्याची अपेक्षा

Subscribe

राज्यातील विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधींशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोना संसर्गाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापार्‍यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

तसेच व्यापार्‍यांनीही कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभीर्याने विचार करून उपाययोजना केल्या जातील, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी न डगमगता, सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया, असे आवाहनही केले. यावेळी प्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जर्‍हाड, राज्य टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी आदी उपस्थित होते.

- Advertisement -

आताची परिस्थिती फार विचित्र आहे. कोरोनाचे हे संकट दुर्दैवी असून ही लाट प्रचंड मोठी आहे. कोणत्याही गोष्टी बंद करण्याची आमची भूमिका नाही, हे यापूर्वीच स्पष्ट केले असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.दरम्यान, तुमच्या सूचनांचा स्वीकार केला, तर कामगार-कर्मचार्‍यांना तुमच्या कुटुंबातील समजून त्यांच्या कोविड चाचण्या करण्यात याव्यात. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी तुम्ही घ्या. यात एकमेकांची काळजी घेणे हे महत्वाचे आहे. नक्कीच या संकटातून बाहेर पडू. पण गेल्यावेळी जी चूक केली, ती पुन्हा करू नये.

कोरोना पूर्ण जात नाही, तोपर्यंत शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. आपण सर्व एक आहोत. शांतपणे, कुठलाही धोका न पत्करता कोणत्या उपाययोजना करता येतील, याचा विचार करू. सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढे जायचे आहे. रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका. हा लढा सरकारशी नाही विषाणूशी लढा आहे. तुम्ही महाराष्ट्राचे भूमीपूत्र आहात. तुमचे नुकसान होऊ देणार नाही. कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. संकटाच्या काळातच शत्रू आणि मित्र कोण यांची ओळख होते. हे समजून घ्या. न डगमगता यातून बाहेर पडायचे आहे. कोरोनावर मात करायची आहे, हे लक्षात घ्या, असेही मुख्यमंत्र्यांनी व्यापार्‍यांशी झालेल्या संवादात सांगितले.

- Advertisement -

विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी वीरेन शहा, बी. सी. भरतीया, जितेंद्र शहा, विनेश मेहता, ललित गांधी, मोहन गुरनानी यांनी चर्चेत म्हणणे मांडले. आताच्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात यावी. व्यापार्‍यांचे काम चालू राहील आणि विषाणू संक्रमण रोखण्यासाठीचे नियमही काटेकोर पालन होईल, असे उपाय योजना करण्याची मागणी करतानाच, ‘ब्रेक द चेन’ला सहकार्य करू, असे व्यापार्‍यांनी सांगितले. यावेळी दिपेन अग्रवाल, जयकृष्ण पाठक, रसेश दोशी, महेश बखाई, निमित शहा, मितेश मोदी, धीरज कोठारी, राजेश शहा, राजेंद्र बठिया, धैर्यशील पाटील, दिलीप कुंभोजकर, संतोष मंडलेचा, वालचंद संचेती आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -