Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र मेट्रो ३ च्या प्रकल्‍पखर्चात १० हजार कोटींची वाढ; वाढीव खर्चाला मंत्रिमंडळाची मान्यता

मेट्रो ३ च्या प्रकल्‍पखर्चात १० हजार कोटींची वाढ; वाढीव खर्चाला मंत्रिमंडळाची मान्यता

Subscribe

मेट्रो ३ चा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा दररोज १३ लाख प्रवाशी प्रवास करतील. तर सन २०३१ पर्यंत दैनंदिन प्रवासी संख्या १७ लाखापर्यंत जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

मुंबई – आरेतील कारशेडवरून अडचणीत सापडलेल्या कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-3 प्रकल्पाच्या खर्चात आता तब्बल १० हजार कोटींनी वाढ झाली असून या सुधारित खर्चास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या प्रकल्‍पाचा मूळ खर्च २३ हजार १३६ कोटी होता. मात्र दोन वर्षे कारशेडच्या वादामुळे काम जवळपास ठप्पच होते. त्‍यामुळे प्रकल्‍पखर्च वाढला असून आता तो ३३ हजार ४०५ कोटी ८२ लाख इतका झाला आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव खर्चाचे खापर ठाकरे सरकारवर फोडले. प्रकल्‍पाचा पहिला टप्पा कोणत्‍याही परिस्‍थितीत २०२३ साली सुरू करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्‍याची माहितीही फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारचे तीन मोठे निर्णय, मुंबई मेट्रो 3 च्या सुधारित प्रस्तावास मान्यता

- Advertisement -

२०१५ साली या मेट्रो प्रकल्‍पाची किंमत २३ हजार कोटी होती. मात्र कारशेडच्या वादावरून गेल्‍या दोन वर्षात या प्रकल्‍पाचे काम रखडलेच होते. कारशेडच्या स्‍थगितीमुळे हा प्रकल्‍प पुढे गेला नाही. प्रकल्‍प रखडल्‍याने आता त्‍याच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. या प्रकल्‍पाचा पहिला टप्पा २०२१ साली पूर्ण व्हायला हवा होता. तर २०२२ मध्ये तो पूर्ण झाला पाहिजे होता. मात्र, २३ हजार कोटींचा हा प्रकल्‍प आता जवळपास ३३ हजार कोटींचा झाला आहे. प्रकल्पाची स्‍थापत्‍य कामे ८५ टक्‍के पूर्ण झाली आहेत. फक्‍त कारडेपोचे काम केवळ २९ टककेच पूर्ण झाले आहे. मात्र आता हे काम वेगाने पूर्ण करून पहिला टप्पा कोणत्‍याही परिस्‍थितीत २०२३ मध्ये पूर्ण झालाच पाहिजे असे निर्देश देण्यात आल्‍याचे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा – …त्यांना शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळात घेतले हे चुकीचे, अजित पवारांची टीका

- Advertisement -

मेट्रो ३ चा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा दररोज १३ लाख प्रवाशी प्रवास करतील. तर सन २०३१ पर्यंत दैनंदिन प्रवासी संख्या १७ लाखापर्यंत जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

मुंबई मेट्रो ३ ची माहिती

मुंबई मेट्रो मार्ग -३ ची एकूण लांबी ३३.५ किमी असून हा मार्ग संपूर्ण भुयारी आहे. या मार्गात २६ भुयारी आणि एक जमिनीवरील अशी २७ स्थानके असून वर्ष २०३१ पर्यंत १७ लाख प्रवासी प्रतिदिन प्रवास करतील असा अंदाज आहे. ही मार्गिका सुरु झाल्यानंतर नरिमन पाँईट, वरळी, वांद्रे कुर्ला संकुल आणि आंतरराष्ट्रीय तसेच आंतरराज्य विमानतळ, मरोळ औद्योगिक वसाहत, सीप्झ अशी महत्वाची केंद्र मेट्रोने जोडली जातील. कुलाबा ते आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अंतर ५० मिनिटात पार करणे सहज शक्य होणार आहे. सध्या बोगद्यांचे ९८.६ टक्के एवढे काम झाले असून भूमिगत स्थानकांचे सुमारे ८२.६ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी ७३.१४ हेक्टर शासकीय जमीन आणि २.५६ हेक्टर खासगी जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे.

- Advertisment -