घरदेश-विदेशयंदा बॅण्डबाजा जोरात! दीड महिन्यांत ३२ लाख लग्न होणार, व्यापाऱ्यांची पुन्हा दिवाळी

यंदा बॅण्डबाजा जोरात! दीड महिन्यांत ३२ लाख लग्न होणार, व्यापाऱ्यांची पुन्हा दिवाळी

Subscribe

कोरोना काळात निर्बंधांमुळे अनेक लग्न पुढे ढकलली होती. मधल्या काळात लॉकडाऊनच्या परिणामामुळे आर्थिकस्थिती डबघाईला आली होती. मात्र, आता वर्षभरापासून परिस्थितीत सुधारण्या झाल्याने अनेक विवाहेच्छुक तरुण तरुणींनी बाशिंग बांधायला सुरुवात केली आहे. CAIT रिसर्च अँड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटीने केलेल्या सर्वेक्षातून असं समोर आलं आहे की यंदा लग्न मोठ्या प्रमाणात होत असून या लग्नांसाठी मुक्तहस्ताने खर्चिक उधळणही होणार आहे.

मुंबई – दिवाळीनंतर संपूर्ण देशात सनई चौघड्यांचे सूर घुमू लागणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले अनेक लग्न यंदा होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे, ४ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या अवघ्या दीड महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३२ लाख लग्न होणार आहेत. या लग्नासाठी तब्बल ३.७५ लाख कोटींची उलाढाल होणार आहे. यामुळे व्यापारांची पुन्हा दिवाळी होणार आहे. CAIT रिसर्च अँड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटीने केलेल्या सर्वेक्षणातून हा अहवाल समोर आला आहे.

कोरोना काळात निर्बंधांमुळे अनेक लग्न पुढे ढकलली होती. मधल्या काळात लॉकडाऊनच्या परिणामामुळे आर्थिकस्थिती डबघाईला आली होती. मात्र, आता वर्षभरापासून परिस्थितीत सुधारण्या झाल्याने अनेक विवाहेच्छुक तरुण तरुणींनी बाशिंग बांधायला सुरुवात केली आहे. CAIT रिसर्च अँड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटीने केलेल्या सर्वेक्षातून असं समोर आलं आहे की यंदा लग्न मोठ्या प्रमाणात होत असून या लग्नांसाठी मुक्तहस्ताने खर्चिक उधळणही होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – यंदाच्या लग्नसराईचे ५८ मुहूर्त; मे महिन्यात सर्वाधिक १४

किती लग्नात किती खर्च येणार?

  • १ कोटी खर्च – ५० हजार लग्नांमध्ये
  • ५० लाख खर्च- ५० हजार लग्नांमध्ये
  • २५ लाख खर्च – ५ लाख लग्नांमध्ये
  • १० लाख खर्च – १० लाख लग्नांमध्ये

यंदा मुहुर्त किती?

पंचांग शास्त्राप्रमाणे यंदा 25 नोव्हेंबर ते पुढील वर्षी 28 जूनपर्यंत विवाहासाठी 58 मुहूर्त आहेत. त्यातही सर्वाधिक 14 मुहूर्त हे मे महिन्यात असून, गुरूच्या अस्तामुळे एप्रिलमध्ये केवळ एकच मुहूर्त आहे. महाराष्ट्रात तुळशीचं लग्न लागल्यानंतर लग्नाचा सिझन सुरू होतो. महाराष्ट्रात ४ नोव्हेंबरपासून लग्नकार्यांना सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर ते १४ डिसेंबरमध्ये लग्न सोहळ्यांचा पहिला टप्पा पार पडणार आहे. त्यानंतर याचा पुढचा सीझन 14 जानेवारी 2023 पासून सुरू होऊन जून-जुलैपर्यंत असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा लग्नासाठी किती दिवस सुट्टी घेऊ शकता? कंपन्यांचे नियम काय सांगतात?

मंगल कार्यालयांसह बँड पथकांची सुपारी महागली

दोन वर्षानंतर यंदा लग्नसराई धुमधडाक्यात साजरी होणार असली तरी त्यांचा फटका वधू-वर पक्षाच्या खिशाला बसणार आहे. मंगल कार्यालय, बॅन्ड पथकांनी त्यांच्या सुपारीत २० ते ३० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्याचबरोबर किराणा मालात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे पंगतीचा खर्चही वाढणार आहे. एकंदरीत यंदा वधू-वर पक्षाच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – तुम्हाला तुमच्या पार्टनरबद्दल ‘या’ 4 गोष्टी ठाऊक आहेत का?, अन्यथा…

लहान-मोठ्या व्यावसायिकांचा आर्थिक गाडा येणार रुळावर

कोरोना संकटकाळामुळे नियमांच्या बंधनात अडकलेल्यांना आता निर्बंधमुक्त समारंभ साजरे करण्यास मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे यंदा लग्नसराई धुमधडाक्यात होईल, अशी चिन्हे आहेत. विशेष म्हणजे या निर्बंधमुक्त वातावरणात लग्नसराईवर अवलंबून असलेल्या लहान-मोठ्या व्यावसायिकांचा आर्थिक गाडा पुन्हा एकदा रूळावर येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वधू-वर पक्षांकडून मंडप, बिछायत, मंगल कार्यालये, वाजंत्री, केटरर्स, सजावट, फुलवाले, घोडेवाले, बेन्जो यांची बुकिंग करायला सुरुवात झाली आहे. या लहान-मोठ्या व्यावसायिकांना ऑर्डर मिळू लागल्याने त्यांच्यामधूनही समाधान व्यक्त केले जाते आहे.

हेही वाचा – आयुष्याचा जोडीदार निवडताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -