औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुखमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळ यांच्यासाठी औरंगाबादमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली. पण राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शासकीय विश्रामगृह मुक्काम हलविला. पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आलेल्या खर्चावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे.
मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांचा मुक्काम हा पंचतारांकित हॉटेल ऐवजी आता शासकीय विश्रामगृहात आहे, यावर संजय राऊत म्हणाले, “प्रचंड टीका झाल्यावर, टीकेचा टीका घेतल्यावर सुभेदारीवरती आमचे हे सुभेदार चालेले आहे. त्याबद्दल त्याचे अभिनंदन तरीही मंत्री आणि पंचतारांकिट हॉटेलमध्ये राहणाऱ्यांचे सर्व पेमेंट सरकारच्या माध्यमातून झालेले आहे. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांचे खाते चेक करा. या औरंगाबादमधील सर्व पंचतारांकित हॉटेल ताब्यात घेतले. यामुळे पर्यटकानी बुकिंग असून देखील त्यांना जागा मिळाली नाही. कारण जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांचे बुकी रद्द केली होती.”
हेही वाचा – संजय राऊतांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेचा घेतला पास, पण…
इंडियाच्या बैठकीवर तीन पक्षाचे पैसे
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आलेल्या नेत्यांचा मुक्काम पांचतारांकित हॉटेलमध्ये केला, असा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी केले आहे. यासंदर्भात संजय राऊत म्हणाले, “आम्ही सरकारी तिजोरीतून पैसे भरले नाहीत. हा सरकारी तिजोरीवर येणारा भार आहे. आम्ही पक्ष म्हणून खर्च केलेला आहे. आम्ही तीन पक्षाने खर्चाचे वाटप केले आहे. तुम्ही आमचे बँकेचे खाते पाहा. जे तुम्हाला प्रश्न विचारत आहेत. ते मुर्ख लोक आहेत. यांची अक्कल इकड संभाजीनगरमध्ये फिरते. सराकरी खर्च जो सुरू आहे. गाड्या, घोडो, पंचतारांकित हॉटेलात जेवणे. यात जेवण्याचे कॉन्ट्रॅक्टर कोणाला दिले. ज्याच्यावर इडीच्या धाडी पडल्यात आहेत. त्यांना जेवण्याचे कान्ट्रक दिले आहे. नम्रता कॅटर्सला जेवणावर कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. हा सरकारी खर्च आहे हा खर्च काय मुंबईतील एए नावेच बिल्ड्रर देणार आहेत का? अजून कोणाची व्यापारी संबंध आहेत. ते देणार आहेत का? आदित्य ठाकरेंनी सभाजीनंगर,नाशिक आणि निफाड याभागात दौरा केला आहे. तुम्ही शेतकऱ्यांचे दु:ख पाहा. शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही. अजून मागच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. आणि आपण इकडे कोट्यावधी रुपये उधळता”, असा सवाल ही संजय राऊतांनी राज्य सरकारला केला आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी ‘या’ कारणामुळे फाइव्ह स्टार हॉटेलमधील मुक्काम शासकीय विश्रामगृहात हलवला
पत्रकार परिषदेत जाण्यासंदर्भात संजय राऊत म्हणाले…
संजय राऊत पत्रकार परिषदेसंदर्भात म्हणाले, “जर मला संधी दिली, तर मी तिथे जाऊन नक्की पत्रकार परिषदेमध्ये जाऊन प्रश्न विचारेन. मी पत्रकार आहे. त्यानंतर येथे ऐवढा गोंधळ झाला. पत्रकार परिषदेला नको तेवढी सुरक्षा व्यवस्था दिली. पत्रकारांना सुद्धा निर्बंध घातले. परिषदेसाठी पास तयार केले गेले, असे कधी होत नव्हते. ऐवढी आमची भीती आहे. एक पत्रकार म्हणून माझा जन्म झाला. मला रात्री पोलीस भेटायला आले आणि अधिकाऱ्यांचे फोन आले. दोन प्रश्न काय मी विचारायच प्रश्न निर्माण केला. तर तुमची ऐवढी धावपळ होते. येथे बसलेल्या मीडियाने जे प्रश्न विरोधी पक्षाला विचारले जात आहेत. ते प्रश्न सरकारला विचारावे, अशी माझी भूमिका आहे.”