घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमौजमजेसाठी महागड्या दुचाकी चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात

मौजमजेसाठी महागड्या दुचाकी चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात

Subscribe

७ बुलेट; ३ दुचाकी जप्त; शहर गुन्हे शाखा युनीट एकची कारवाई

मौजमजेसाठी वाहन चोरी करणार्‍या तरुणाच्या नाशिक शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून ७ बुलेट व इतर ३ दुचाकी वाहने जप्त केली. शहर गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाने ही कामगिरी केली. पवन ऊर्फ विक्की प्रेमचंद पाटील (वय २५, रा.नवागाव, उदना, सूरत, मूळ रा.आव्हानी पाळदी, ता.धारणगाव, जि.जळगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी वाहन चोरणार्‍यांचा शोध घेवून वाहने हस्तगत करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. भद्रकाली पोलीस ठाण्यात ११ एप्रिल रोजी बुलेट चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनीट एकने समांतर तपास सुरु केला. पोलीस हवालदार मुख्तार शेख यांनी ज्या ठिकाणाहून बुलेट चोरीला गेली, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळवत निरीक्षण केले. तांत्रिक विश्लेषण करुन शेख यांनी आरोपीची ओळख पटवत तो नंदुरबारचा असल्याची माहिती मिळाली. १४ एप्रिल रोजी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णे,रघुनाथ शेगर, पोलीस हवालदार मुख्तार शेख, राहुल पालखेडे आदींचे पथक नंदुरबारमध्ये आले. या ठिकाणी पथकाने दोन दिवस तपास केला. संशयित आरोपी पवन पाटील यास नंदुरबार बसस्टॅण्ड परिसरातून पथकाने ताब्यात घेतले. त्याने सूरतमध्ये चार, धुळे दोन, पंचवटीत एक, भद्रकालीत एक आणि मुंबईनाका परिसरात एक अशा एकूण ९ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. यामध्ये सर्वाधिक सात बुलेट आहेत. पथकाने त्यास वाहनचोरीच्या गुन्ह्यात अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

- Advertisement -

पोलीस हवालदार मुख्तार शेख यांचा सत्कार

सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाव्दारे आरोपीस पोलीस हवालदार मुक्तार निहाल शेख यांनी शोधून काढले. आरोपीस नंदुरबारमधून अटक करत ९ दुचाकी जप्त केल्या. उत्कृष्ट कामगिरीबद्दल शेख यांचा सत्कार पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी प्रशंसापत्र व गुलाबपुष देवून केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -