घरताज्या घडामोडीराज्यातील सरकारला धोका नाही, असे सत्ताधारी सातत्याने का सांगत आहेत? याचा अर्थ...

राज्यातील सरकारला धोका नाही, असे सत्ताधारी सातत्याने का सांगत आहेत? याचा अर्थ काय काढायचा?

Subscribe

नाना पटोलेंकडून मुख्यमंत्री पदासाठी इच्छा व्यक्त

राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, आणि शिवसेना या घटक पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आहे. परंतु सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून महाविकास आघाडी सरकरा फार काळ टीकणार नाही असे म्हटलं जात आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्री पदाबाबतच्या मुद्द्यावरुन भाजपची फारकत घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आणि ते मुख्यमंत्री बनले. परंतु सत्तेपासून दूर असलेल्या भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेला घटक पक्ष काँग्रेस येत्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका स्वबळावर लढवणार असल्याच्या घोषणा करत आहेत तसेच पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिल्यास स्विकारेल असे वक्तव्य केल्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या वाटाघाटीबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. परंतु राज्य सरकारमधील नेते महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे टीकणार असल्याचे वारंवार म्हणत आहेत.

मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये ५ वर्षे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेच राहणार असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय सावंत यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदाबद्दल स्पष्ट निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महाविकास आघाडीमध्ये तीन्ही पक्षाची वाटे ठरवले आहेत. शिवसेनेकडे ५ वर्ष मुख्यमंत्रीपद असेल असे संजय राऊत यांनी सामनातून स्पष्ट केलं आहे. असं शरद पवार यांनी देखील सुरुवातील स्पष्ट केलं असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

नाना पटोलेंकडून मुख्यमंत्री पदासाठी इच्छा व्यक्त

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विदर्भ दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य केलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका काँग्रेसनं स्वबळावर लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. तसेच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूकाही स्वबळावर लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. २०२४ मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस हायकमांड ठरवेल कोण मुख्यमंत्री होणार परंतु मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिल्यास स्विकारेल असे वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. नाना पटोलेंच्या वक्तव्यामुळे राज्यातील मुख्यमंत्रीपदाबाबत काही वाटाघाटीचा फॉर्म्युला ठरला आहे का? असा तर्क राजकीय वर्तुळात लढवला जात आहे. तसेच नाना पटोले यांनीही सरकार ५ वर्ष यशस्वी वाटचाल करणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील असे म्हटलं आहे.

स्वप्न बघणं हा गुन्हा नाही – अजित पवार

अजित पवार यांना नाना पटोलेच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्याबाबत प्रश्न केला असता अजितदादांनी आपल्या शैलित उत्तर दिले आहे. तू ज्या चॅनलमध्ये काम करतो तिथं तुला मुख्य संपादक व्हावं असं वाटत नाही का? असा सवाल अजित पवार यांनी केला यामुळे एकच हशा पिकला होता. स्वप्न बघँ हा काही गुन्हा नाही. आमची आघाडी असली तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. काँग्रेसनं कोणासोबत निवडणूक लढवायची किंवा काय हा अधिकार सोनिया गांधींचा आहे. राष्ट्रवादीनं कुणासोबत आघाडी करावी न करावी हा अधिकार पवार साहेबांचा आहे. शिवसेनाच अधिकार उद्धव ठाकरेंना आहे असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मोदी-ठाकरे भेटीमुळे नेत्यांमध्ये अस्वस्थता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसह शिष्टमंडळाने ११ मुद्द्यांवर तब्बल १ तास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. मोदींसमोर राज्याती अनेक विषय मांडण्यात आले होते. यानंतर मुख्यमंत्री ठाकेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अर्धा तास वैयक्तिक भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. मोदी-ठाकरे भेटीमुळे राज्य सरकारमधील घटक पक्षांमध्ये अस्वस्थता दिसत होती.

मोदी- ठाकरेंच्या भेटीवर शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी संवाद साधताना बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांना दिलेल्या शब्दाला कसं पाळलं होते याचीही आठवण करुन दिली. तसेच शिवसेना विश्वासाचा पक्ष असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं होते. परंतु शरद पवार यांनी ऐन मोक्यावर असे का वक्तव्य केलयं याचा सगळ्यांना विचार पडला आहे.

मोदी ठाकरेंच्या भेटीवर भाजपकडून मात्र समाधानी उत्तर मिळत आहे. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. की, पक्षश्रेष्टींनी सांगितले वाघाशी मैत्री करा तर आम्ही करु तसेच मोदी ठाकरेंच्या भेटीमुळे राज्यालाच फायदा होईल असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटंल आहे की, मोदी- ठाकरे यांच्या भेटीमुळे राज्यालाच फायदा होईल. या भेटीचे स्वागत असल्याचे भाजपकडून म्हटलं आहे.

सरकार ५ वर्षे टीकणार

महाविकास आघाडी सरकार ५ वर्षांचा काळ पुर्ण करु शकेल का? असा प्रश्न राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेने नेते आदित्य ठाकरे यांना करण्यात आला होता. यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, तीन पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली ही चांगली गोष्ट आहे. तीन पक्ष सेवा करण्यासाठी आणि महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी एकत्र आले आहेत. महाविकास आघाडीमधील वाद असल्याचे दावे केले जात आहेत. परंतु सरकारमध्ये कोणताही वाद वाटत नाही असे मत आदित्य ठाकरे यांनी म्हटंल आहे. लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या विचारसरणी एकत्र येतात आणि विश्वेषण करुन काम केल तर अधिक चांगल्या पद्धतीनं सेवा देता येते. असं झाल्यास सरकार ५ वर्षे नाही तर पुढेही काम करत राहील असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीला अडीच वर्ष

महाविकास आघाडीला स्थापित होऊन आता अडीच वर्षांचा कालावधी पुर्ण होत आहे. यामुळे आता मुख्यमंत्रीपदाबाबत काही फॉर्म्युला ठरलाय का अशी चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी उत्सुक असल्याचे दिसत आहे. यामुळे अडीच वर्ष पुर्ण झाल्यावर राष्ट्रवादीत हालचाल होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतल्यामुळे देखील राज्यातील राजकारणात खळबळ माजली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली असल्यामुळे आता मुख्यमंत्री पदावरुन राज्य सरकारमध्ये वाद निर्माण होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -