घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमनमाडनजीक बुलेट ट्रकला अपघात, सिलिंडर्सचा स्फोट

मनमाडनजीक बुलेट ट्रकला अपघात, सिलिंडर्सचा स्फोट

Subscribe

मनमाडनजीक पुणे -इंदूर महामार्गांवर झाला अपघाता, सिलिंडर्स रॉकेटसारखे हवेत उडाले

मनमाड – गॅस सिलेंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक उलटून भीषण आग लागल्याची घटना शनिवारी (दि.८) दुपारच्या सुमारास मनमाडनजीक घडली. पुणे -इंदूर महामार्गांवर झालेल्या या अपघातात सिलिंडर्स रॉकेटसारखे हवेत उडत होते. सिलेंडरचे स्फोट होत असल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे किलोमीटर अंतरावर रोखून ठेवण्यात आली आहे. ट्रकमध्ये गॅसने भरलेले सुमारे २०० सिलेंडर असल्याचे सांगितले जात आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असले तरीही भीषण आग आणि सिलिंडरच्या स्फोटांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडथळे येत आहेत. अपघातात चालक जखमी झाला असून, त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटांच्या आवाजांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -