Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी पैसे लावले पाहिजे - राज ठाकरे

सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी पैसे लावले पाहिजे – राज ठाकरे

Subscribe

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पार्ल लोकमान्य टिळक संघाच्या २०२२-२३ च्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी राज ठाकरेंनी सोशल मिडियवर व्यक्त होण्यासाठी पैसे लावले पाहिजेत असे वक्तव्य केले आहे.

राज ठाकरेंनी पार्ल लोकमान्य टिळक संघाच्या कार्यक्रमात म्हटले की, सध्याचे महाराष्ट्रामधील राजकारण बघितले तर असे वाटते की मी या राजकारणासाठी फीट नाही. कारण महाराष्ट्राची अशी परिस्थिती मी आजपर्यंत पाहिली नाही. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षातील लोक ज्या प्रकारे सोशल मिडियाच वापर करतात, त्यावर व्यक्त होतात. हे पाहून असे वाटते की, सोशल मिडियावर व्यक्त होण्यासाठी पैसे लावले पाहिजेत. म्हणजे हे लोक गप्प बसतील.

- Advertisement -

राजकीय पक्षातील लोक काहीही बोलतात आणि टेलिव्हिजन चॅनेलवाले काहीही बातम्या दाखवतात. मी या विषयावर मागे अनेकदा बोललो आहे. मी चॅनेल पाहत नाही, पण सोशल मिडियावर जे रिल येतात त्यात राजकीय लोक वाट्टेल ते बोलतात. मला या सर्व गोष्टींचा विट यायला लागला आहे. महाराष्ट्रातील लोकांनी अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचे राजकारण पाहिले आहे. पण आजचा महाराष्ट्र त्यांनी याआधी कधी पाहिला नसेल. ज्या महाराष्ट्राने देशाच प्रबोधन केल त्या महाराष्ट्राच प्रबोधन करावं लागत आहे.

1991-92 ला डंकेल आणि गॅट आल्यानंतर मार्केट सुरू झाल्यानंतर भारतासाठी पूर्ण जग उघड झाले. 1995 नंतर भारतामध्ये चॅनेल, इंटरनेट सर्वच गोष्टी आल्या. या सर्व गोष्टींमधून राजकारण, चळवळी, संस्था आणि अश्या अनेक गोष्टीतून महाराष्ट्रातील सुशिक्षित मध्यम वर्ग बाहेर पडला. सुशिक्षित मध्यम वर्गाने ठरवेल की, माझी मुल परदेशात जातील, पण आता राजकारणात पडायचे नाही. त्यामुळे श्रीमंत आणि गरीब यातला जो दुवा होता तो हरवला गेला.

- Advertisement -

राजकारणातला ऱ्हास व्हायला सुरुवात कधी झाली असेल तर ती तिकडून झाली. १९९५ च्या आधीचा काळ पाहिला तर राजकीय पक्ष, चळवळ, संस्था हे सर्व सांभाळणारे कोणत्याही पक्षाचे असले तरी ते सर्व मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग यातले होते. श्रीमंत आणि गरीबीमधला तो दुवा होता. तो दुवा गेल्यामुळे कोण कोणाला सांभाळणार हा प्रश्नच पडला.

- Advertisment -