घरगणेशोत्सव 2022महिलेला मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्याची मनसेकडून हकालपट्टी; पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त

महिलेला मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्याची मनसेकडून हकालपट्टी; पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त

Subscribe

नागपाडामधील मुंबादेवी परिसरात गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्यावरून झालेल्या वादात एका महिलेला मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मारहाण प्रकरणी आता मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

नागपाडामधील मुंबादेवी परिसरात गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्यावरून झालेल्या वादात एका महिलेला मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मारहाण प्रकरणी आता मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. नागपाडा पोलिसांनी मनसे उप विभागप्रमुख विनोद अरगिले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे. याप्रकरणाची मनसे पक्षाकडून दखल घेण्यात आली आहे. महिलेला मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली असून, पत्राद्वारे दिलगिरी वक्त करण्यात आली आहे. (Expulsion of office bearers from MNS for beating woman Apologize by letter)

विनोद अरगिली यांच्यासह राजू अरगिले व सतीश लाड अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून विनोद अरगिले, राजू अरगिले, सतीश लाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तिघांच्या विरोधात नागपाडा पोलिसांनी कलम 323, 337, 506, 504, 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मनसेचे पत्र

दिनांक 1 सप्टेंबर 2022 रोजी कामाठीपूरा या परिसरात घडलेली घटना पाहून, मनः विषन्न झाले. पक्षाध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांनी महिलांचा सदैव आदर केलेला आहे. तशाच प्रकारचा सक्त आदेश कार्यकर्त्यांना सुध्दा दिला असतांना सदर घडलेल्या घटनेबाबत पक्षाच्या वतीने मी दिलगीरी व्यक्त करीत आहे. पक्षाने याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतलेली असून, त्याचा एक भाग म्हणून कामाठीपूरा विभागातील उपविभाग अध्यक्ष श्री. विनोद अरगिले यांस पदावरून पदमुक्त करण्यात येत आहे. भविष्यात या प्रकरणाची प्रत्यक्ष माहिती घेवून व सखोल चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. महिलांचा व जेष्ठांचा आदर सन्मान हा राखला गेलाच पाहिजे.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबादेवी परिसरात गणेश भक्तांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यासाठी आरोपींनी पीडित महिलेच्या दुकानासमोर बांबू उभे केले होते, यावेळी पीडित महिलेने दुकानासमोर बांबू उभे करण्यास विरोध केला. ज्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी महिलेला शिवागाळ करत मारहाण केली, या घटनेचा व्हिडीओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यावर युजर्सकडूनही संताप व्यक्त होत आहे.


हेही वाचा – पारतंत्र्याची आणखी एक निशाणी आज पुसली गेली; नौदलाच्या नवीन ध्वजासाठी फडणवीसांकडून मोदींचे कौतुक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -