घरमहाराष्ट्रमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ

Subscribe

आज पुन्हा विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी त्यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ झाली आहे. त्यांना २ नोव्हेंबर २०२१ साली अटक झाली होती. तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत. 

मुंबई – माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. विशेष पीएमएलए न्यायालयात आज अनिल देशमुख यांना हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी अनिल देशमुख यांना २७ सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. (Anil Deshmukh judicial custody extended by 14 days)

हेही वाचा – मनसे विभाग प्रमुख वृशांत वडकेला बलात्काराच्या आरोपानंतर अटक

- Advertisement -

अनिल देशमुख २९ ऑगस्ट रोजी चक्कर येऊन तुरूंगात पडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जे. जे. रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर संध्याकाळीच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दुसऱ्यादिवशी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १३ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. आज पुन्हा विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी त्यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ झाली आहे. त्यांना २ नोव्हेंबर २०२१ साली अटक झाली होती. तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत.

हेही वाचा – …तर बापाच्या जागी बाळासाहेबांचं नाव लावा, बंडखोर आमदारांना भास्कर जाधव यांचं आव्हान

- Advertisement -

नेमके काय आहे प्रकरण?

गेल्यावर्षी मार्चमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईतील रेस्टॉरंट व बार मालकांकडून दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता.

याप्रकरणी सीबीआयने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये देशमुख व वाझे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. उच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -