घरमहाराष्ट्रमुंबई-फैजाबाद / कारैक्काल दरम्यान विशेष गाड्यांचा कालावधीचा विस्तार

मुंबई-फैजाबाद / कारैक्काल दरम्यान विशेष गाड्यांचा कालावधीचा विस्तार

Subscribe

प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

१. लोकमान्य टिळक टर्मिनस-फैजाबाद द्वि-साप्ताहिक अतिजलद विशेष

०१०६७ विशेष दि. १४ एप्रिल २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर बुधवार आणि शनिवारी ०६.०० वाजता सुटेल आणि फैजाबादला दुसर्‍या दिवशी सकाळी ०८.५५ वाजता पोहोचेल.

०१०६८ विशेष १५ एप्रिल २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत फैजाबाद येथून दर गुरुवार आणि रविवारी १३.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी सकाळी १६.०५ वाजता पोहोचेल.

- Advertisement -

थांबे : मध्य रेल्वेवर ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, बुरहानपूर, खंडवा.

संरचना : १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १२ शयनयान, ३ द्वितीय आसन श्रेणी.

- Advertisement -

२. लोकमान्य टिळक टर्मिनस-कारैकाल साप्ताहिक विशेष

०१०१७ विशेष दि. १७ एप्रिल २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर शनिवारी १३.१५ वाजता सुटेल आणि कारैक्काल ‍येथे दुस-या दिवशी १८.५० वाजता पोहोचेल.

०१०१८ विशेष दि. १९ एप्रिल २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत कारैक्काल येथून दर सोमवारी १४.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुस-या दिवशी २०.३० वाजता पोहोचेल.

थांबे : मध्य रेल्वेवर ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सोलापूर, कलाबुरागी, वाडी.

संरचना : १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीयवातानुकूलित, १२ शयनयान, ३ द्वितीय आसन श्रेणी.

आरक्षण : ०१०६७ आणि ०१०१७ विशेषचे बुकिंग दि. ७ एप्रिल २०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या विस्तृत माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


हे हि वाचा – मुंबई पोलिसांकडून शहरात जमावबंदीचा आदेश जाहीर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -