Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचा धावण्याच्या कालावधीचा विस्तार

मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचा धावण्याच्या कालावधीचा विस्तार

सुधारित संरचनेसह अतिरिक्त विशेष गाड्यांच्या धावण्याच्या कालावधीचा विस्तार

Related Story

- Advertisement -

सुधारित संरचनेसह अतिरिक्त विशेष गाड्यांच्या धावण्याच्या कालावधीचा विस्तार

१. पनवेल-गोरखपूर विशेष

- Advertisement -

०५१८६ विशेष दि. १६ एप्रिल २०२१ व २० एप्रिल २०२१ रोजी पनवेल येथून ०९.१५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसर्‍या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल.

०५१८५ विशेष दि. १५ एप्रिल २०२१ व १९ एप्रिल २०२१ रोजी गोरखपूर येथून ००.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसर्‍या दिवशी ०६.१५ वाजता पोहोचेल.

- Advertisement -

थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, हबीबगंज, झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, गोंडा, बस्ती.

संरचना : २ तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान, १२ द्वितीय आसन श्रेणी.

२. पुणे-गोरखपूर विशेष

०१४४३ विशेष दि. १९ एप्रिल २०२१, २३ एप्रिल २०२१ व २७ एप्रिल २०२१ रोजी पुणे येथून २१.३० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसर्‍या दिवशी ०६.३५ वाजता पोहोचेल.

०१४४४ विशेष दि. १७ एप्रिल २०२१, २१ एप्रिल २०२१ व २४ एप्रिल २०२१ रोजी गोरखपूर येथून २१.१५ वाजता सुटेल आणि पुणे येथे तिसर्‍या दिवशी ०६.२५ वाजता पोहोचेल.

थांबे : दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ बीना, झाशी, कानपूर सेंट्रल, गोंडा, बस्ती.

संरचना : २ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ९ द्वितीय आसन श्रेणी.

आरक्षण : पूर्णतः आरक्षित

०५१८६, ०१४४३या विशेष गाड्यांचे विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर आधीच सुरू आहे.

विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या विस्तृत माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


हे हि वाचा – NEET PG 2021: येत्या रविवारी होणारी नीट पीजीची परीक्षा स्थगित

- Advertisement -