घरमहाराष्ट्रशिष्यवृत्तीकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

शिष्यवृत्तीकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Subscribe

गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च आणि तंत्र शिक्षण विभागामार्फत परदेशातील उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. ही मुदत वाढ ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

उच्च आणि तंत्र शिक्षण विभागामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण विभागाची शिष्यवृत्ती मिळणार आहे. ही योजना उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणे या नावाने शैक्षणिक वर्ष २०१८ – १९ पासून राबविण्यात येणार आहे.

ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरा

संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणे त्यासोबत आवश्यक प्रमाणपत्र आणि कागदपत्र अर्जासोबत अपलोड करणे यासाठी १० नोव्हेंबर २०१८ मुदत देण्यात आली होती. मात्र ता ही मुदत ३१ डिसेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, आवश्यक प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे साक्षांकित प्रतीसोबत मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी संबंधित विभागीय कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. तसेच कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण विभागाचे विभागीय कार्यालय तर व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वास्तुकलाशास्त्र आणि औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी तंत्र शिक्षणाचे विभागीय कार्यालय यांना ७ जानेवारी २०१९ सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमा करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरणे

इच्छुक विद्यार्थ्यांनी www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणे आवश्यक असून प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाशिवाय इतर कोणत्याही पध्दतीने केलेला अर्ज विचारात घेण्यात येणार नाही. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत आणि आवश्यक प्रमाणपत्र आणि कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसोबत अर्ज संबंधित कोणत्याही विभागीय कार्यालयात मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -