घरमहाराष्ट्रCET परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 11 मेपर्यंत मुदतवाढ

CET परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 11 मेपर्यंत मुदतवाढ

Subscribe

CET ची तारीख पुढे ढकलल्यानंतर या परीक्षांसाठीची ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख उच्च तंत्रशिक्षण विभागाकडून 4 ते 11 मे दरम्यान वाढवली आहे. मेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून एक विशेष बाब म्हणून परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे,

उच्च तंत्रशिक्षण विभागाकडून सीईटी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना 4 ते 11 मे दरम्यान ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. या संदर्भात तंत्रशिक्षण विभागाकडून एक परीपत्रक काढण्यात आले आहे. यापूर्वी CET परीक्षा जूनमध्ये होणार होती. मात्र, NEET आणि JEE परीक्षांच्या तारखा आणि CET परीक्षेची तारीख एकत्र येत असल्याने CET परीक्षेची तारीख ऑगस्ट महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

CET ची तारीख पुढे ढकलल्यानंतर या परीक्षांसाठीची ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख उच्च तंत्रशिक्षण विभागाकडून 4 ते 11 मे दरम्यान वाढवली आहे. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून एक विशेष बाब म्हणून परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ अंतिम असून यापुढे कोणत्याही प्रकारची मुदतवाढ ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी देण्यात येणार नाही, असे उच्च तंत्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. एमएचटी- सीईटी-2022, एमबीए/ एमएमएस सीईटी 2022, एमसीए सीईटी 2022, एम.आर्च सीईटी 2022, एम.एचएमसीटी 2021 या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे.

- Advertisement -

JEE आणि NEET परीक्षांमुळे CET परीक्षा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून लवकरच तारखा जाहीर करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. मात्र, अद्याप नव्या तारखांची घोषणा करण्यात आलेली नाही.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -