घरमहाराष्ट्रExtortion Case : परमबीर सिंह यांना आज फरार घोषित करणार?

Extortion Case : परमबीर सिंह यांना आज फरार घोषित करणार?

Subscribe

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंह यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांच्यावर खंडणीचे पाच गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना अनेकदा समन्स बजावून पण चौकशीला उपस्थित न राहिल्याने परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केला आहे. यावर आज मंगळवारी मुख्य दंडाधिकारी न्यायालय निर्णय देणार आहे.

परमबीर सिंह यांच्यावर ठाणे आणि मुंबईमध्ये पाच वेगवेगळे खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांचा तपास मुंबई गुन्हे शाखेचं पथक करत आहे. गुन्हे शाखेच्या तपासानुसार परमबीर सिंह हे फरार झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांना गुन्हेगार घोषित करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केला आहे. या व्यतिरिक्त रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू या इतर दोन आरोपींना गुन्हेगार घोषित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

विशेष सरकारी वकील शेखर जगताप म्हणाले, आमच्याकडे आधीच आरोपींविरुद्ध तीन अजामीनपात्र वॉरंट आहेत, त्यामुळे आम्ही आरोपीला गुन्हेगार घोषित करण्यासाठी हा अर्ज करत आहोत. या आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३८४, ३८५, ३८८, ३८९, १२० (ब) आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदवलेला आहे. दरम्यान, या अर्जावर न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. ३० ऑक्टोबर रोजी त्याच दंडाधिकारी न्यायालयाने परमबीर सिंग आणि इतर दोन जणांविरुद्ध दुसरे अटक वॉरंट जारी केलं होतं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -