घरमहाराष्ट्रनागपूरात कोरोना रोखण्यासाठी अतिरिक्त बेड्सह, कॉलसेंटरची यंत्रणा

नागपूरात कोरोना रोखण्यासाठी अतिरिक्त बेड्सह, कॉलसेंटरची यंत्रणा

Subscribe

नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतली कोरोना आढावा बैठक

नागपूरात कोरोना परिस्थिती संर्दभात नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज शनिवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये नागपुरात लसीकरणाचा वेग वाढवणार असल्याचे सांगितले आहे. तसेच लसीकरणाबाबत अनेकांच्या मनात समज-गैरसमज जरी असले, तरीही कोरोना लस प्रत्येकाला घ्यावीच लागणार असल्याचे पालकमंत्र्यानी स्पष्ट केले. केंद्र सरकारने ४५ वर्षाच्या वयोगटाच्या पुढील लोकांना लसीकरणाच्या सूचना दिल्या आहेत. त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी करावा असे आवाहन देखील राऊत यांनी केले आहे. ग्रामीण भागातील लोकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी ऐकून तालूकानिहाय तहसिलदार आणि जिल्हानिहाय उपजिल्हाधिकारी यांना समन्वयक म्हणून निवडीनंतर कॉलसेंटर देखील सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मनपा क्षेत्रातही कॉलसेंटर आहे अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. महापालिका क्षेत्रातील कॉलसेंटरवर अतिरिक्त महापालिका आयुक्त नजर ठेवणार आहे. नागपूरमध्ये अतिरिक्त बेड वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. ऑक्सिजनच्या पुरवठ्या बाबतीत राज्य सरकारशी बातचीत सुरु असल्याचे राऊत यांनी सांगितले.

येत्या दिवसात मोहोदा रामटेक या ठीकाणी नव्याने कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. खाण कर्मचाऱ्यांचे तातडीने लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णालयात होणाऱ्या ओपीडीमध्ये प्रत्येकाचे लसीकरण करण्यात येईल आणि लसीकरणासाठी संबधित विभागाने प्रर्यत्न करावा, असेही आदेश त्यांनी दिले आहेत. अतिरिक्त १०० नवीन बेड्स साठी मुबलक मॅन पॅावर लागणार आहे. तसेच जे डॉक्टर्स कामावर रूजू झाले नाहीत अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हे हि वाचा – पुण्यात मिनी लॉकडाऊन, विद्यापीठामार्फत सराव परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -