घरताज्या घडामोडीअरे वा! गणपतीत कोकणात जाण्यासाठी अतिरिक्त ३२ रेल्वेगाड्या, आजपासूनच बुकिंग सुरू

अरे वा! गणपतीत कोकणात जाण्यासाठी अतिरिक्त ३२ रेल्वेगाड्या, आजपासूनच बुकिंग सुरू

Subscribe

कोकणवासियांसाठी तब्बल १०६ विशेष गाड्या गणपतीसाठी सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, अतिरिक्त 32 स्पेशल गाड्यांच्या फेऱ्यांच्या वेळा, स्टेशन आणि डब्यांची रचना यात कोणताही बदल झालेला नाही.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या विशेष गाड्या (Special Trains for ganapati festival) अवघ्या काही दिवसांतच फुल्ल झाल्या आहेत. मात्र, अजूनही कित्येक चाकरमन्यांनी कोकणात जाण्यासाठी बुकींग केलेली नाही. त्यामुळे कोकण रेल्वेने त्यांच्यासाठी आणखी काही विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केल्याने दिलासा मिळाला आहे. कोकण रेल्वेकडून याआधी ७६ विशेष गाड्या गणपतीसाठी सोडण्यात आल्या होत्या. आता यात वाढ करण्यात आली असून अतिरिक्त ३२ स्पेशल गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच, कोकणवासियांसाठी तब्बल १०६ विशेष गाड्या गणपतीसाठी सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, अतिरिक्त 32 स्पेशल गाड्यांच्या फेऱ्यांच्या वेळा, स्टेशन आणि डब्यांची रचना यात कोणताही बदल झालेला नाही. (Extra trains will be run on konkan railway for ganapti festival)

हेही वाचा – कोकण रेल्वे प्रवास आता ‘सुपरफास्ट’, विद्युतीकरण प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

- Advertisement -

मुंबईसह आजूबाजूच्या शहरात मोठ्या प्रमाणात कोकणातील लोक राहतात. गणपतीच्या काळात यातील बहुतांश वर्ग गावी कोकणात जातो. त्यासाठी रेल्वे सेवा सोयीची असल्याने गणपतीसाठी आधीपासूनच बुकींग करून ठेवलेली असते. गणपतीत कोकणात जाण्यासाठी तिकिट्स मिळणे हिसुद्धा मोठी बाब असते. त्यामुळे कोकण रेल्वेकडून अतिरिक्त गाड्या सोडल्या जातात. यावर्षी सुरुवातीला ७६ स्पेशल गाड्या सोडण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. अगदी कमी कालावधीत या गाड्या फुल्ल झाल्या. त्यामुळे अनेक कोकणवासियांचा हिरमोड झाला आहे. त्यातच, रस्ते मार्गे जाणे सध्या जिकरीचं बनल्याने कोकण रेल्वेने आणखी अतिरिक्त ३२ गाड्या सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा – पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज; सुरळीत वाहतुकीसाठी अद्ययावत यंत्रणांचा वापर

- Advertisement -

या अतिरिक्त गाड्यांची बुकींग आजपासूनच म्हणजे ८ जुलैपासून सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तसेच तिकिट काऊंटरवर जाऊनही तिकिट बुक करू शकता. सीएसएमटी ते सावंतवाडी, नागपूर ते मडगाव, पुणे ते कुडाळ, पुणे-कुडाळ/थिविम, पनवेल-कुडाळ/थिविम या मार्गांवर या विशेष अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत.

हेही वाचा – चला..तिकिटा बुक करूक व्हयी! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे तिकिटांचे बुकिंग एप्रिलच्या कोणत्या तारखेपासून सुरू ? वाचा सविस्तर

वेळापत्रक कसे असेल?

  1. गाडी क्र. 01137 : मुंबई- सावंतवाडी दैनिक विशेष (16 फेऱ्या) ही ट्रेन 13 ते 20 ऑगस्टदरम्यान सीएसएमटीवरून दररोज रा. 12.20 वाजता सुटेल आणि दु. 2.00 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
  2. गाडी क्र. 01138 : सावंतवाडी-मुंबई ही परतीच्या प्रवासाची ट्रेन 13 ते 20 ऑगस्टदरम्यान दररोज सावंतवाडी रोड येथून दु. 2.40 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री 3.45 वाजता पोहोचेल.
  3. गाडी क्र. 01143 : पनवेल-कुडाळ/थिविम (४ फेऱ्या) ही विशेष ट्रेन 14 ते 21 ऑगस्टदरम्यान पनवेल येथून पहाटे 5,00 वा. सुटेल आणि कुडाळला दु. 2.00 वाजता पोहोचेल.
  4. गाडी क्र. 01144 : ही विशेष गाडी 13 ते 20 ऑगस्टदरम्यान थिविम येथून दु. 2.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे मध्यरात्री 2.45 वाजता पोहोचेल.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -