घरताज्या घडामोडीराहुल गांधी यांना फेसबुककडून नोटीस, इन्स्टाग्राम पोस्ट हटवण्याचे आदेश

राहुल गांधी यांना फेसबुककडून नोटीस, इन्स्टाग्राम पोस्ट हटवण्याचे आदेश

Subscribe

बलात्कार पीडितेच्या कुटूंबीयांचे फोटो इन्स्टाग्रामवर केले होते शेअर

फेसबुकने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना इन्स्टाग्राम पोस्ट डिलिट करण्यासाठी फेसबुकने नोटीस बजावली आहे. दिल्लीतील बलात्कार पिडित कुटूबीयांची पोस्ट हटवण्यासाठी ही नोटीस पाठविण्यात आली आहे. दिल्लीतील १ ऑगस्टला घडलेल्या ९ वर्षीय मुलीच्या बलात्काराच्या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी बलात्कार पिडितेच्या कुटूंबीयांची भे घेतली. तसेच कुटूंबीयांचे फोटो हे सोशल मिडियावर पोस्ट केले. तसेच या कुटूंबाला न्याय हवाय असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते. या पोस्टमुळेच फेसबुकने राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे.

फेसबुकने राहुल गांधी यांना पाठवलेल्या नोटीशीत म्हटले आहे की, तुम्ही इन्स्टाग्रामवर अपलोड केलेली पोस्ट ही बेकायदेशीर आहे. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड्स राईट्स (एनसीपीसीआर) च्या नोटीशीनुसार ही पोस्ट तुम्ही काढून टाकावी असे फेसबुकने म्हटले आहे. फेसबुकने नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड्स राईट्सकडे हा अहवाल दाखल केला आहे. याआधी एसीपीआरने फेसबुकला या प्रकरणात नोटीस बजावली होती. तसेच फेसबुकच्या प्रतिनिधीला हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले होते. पण एनसीपीसीआरने हे आदेश नंतर मागे घेतले.

- Advertisement -

एनसीपीसीआरने फेसबुकला दिलेल्या आदेशात राहुल गांधी यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बेकायदेशीर पोस्ट केल्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये पॉक्सो, जुवेनाईल जस्टिस अॅक्ट २०१५ नुसार बेकायदेशीर पोस्ट केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते. याआधी ट्विटरनेही राहुल गांधी यांचे अकाऊंट याच प्रकरणात लॉक केले होते. राहुल गांधी यांनी याच प्रकरणातील ट्विट्स केले होते. त्यानंतर ट्विटरकडून राहुल गांधी यांच्या अकाऊंटवर कारवाई करण्यात आली.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -