घरमहाराष्ट्रफेसबुकवर 'फेक' पोस्ट टाकणारे पकडले जाणार

फेसबुकवर ‘फेक’ पोस्ट टाकणारे पकडले जाणार

Subscribe

फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी फेसबुक फिल्टर सेंटर सुरु करत आहे. त्यामुळे फेक न्यूज पसरवणाऱ्यांना चोप बसणार आहे.

फेसबुकवर चुकीची माहिती देणाऱ्यांना आता चांगलाच चोप मिळणार आहे. कारण, फेसबुककडून आता फिल्टर सेंटर उभारण्यात आलं आहे. त्यामुळे फेसबुकवरील एखादी वादग्रस्त किंवा कुठलिही पोस्ट खरी आहे की खोटी हे एका क्लिकवर समजणार आहे. फेसबुकवर चुकीची माहिती प्रसारीत झाल्यामुळे देशात बऱ्याचदा मोठा गदरोळही झाला आहे. खोट्या मजकुराच्या पोस्टमुळे चुकीची माहितीदेखील लोकांपर्यंत पोहोचली आहे. या गोष्टींवर आता फिल्टर सेंटरच्यामार्फत आळा घालता येणार आहे. शिवाय, ‘फेक’ न्यूज पोस्ट करणाऱ्यांनाही या फिल्टर सेंटरमुळे चोप बसणार आहे.

औरंगाबादमध्ये राज्यातील पहिलं सेंटर

फेक न्यूजच्या विरोधात ठोस पाऊल उचलली जावे, अशी आशा गेल्या कित्येक दिवसांपासून वर्तवली जात होती. अखेर यावर नियंत्रण मिळवले जावे, यासाठी फेसबुककडून एक यंत्रणा उभारण्याचे काम सुरु झाले आहे. याची सुरवात औरंगाबाद येथून झाली आहे. औरंगाबादमध्ये राज्यातील पहिलं फेसबुक फिल्टर सेंटर सुरु करण्यात आलं आहे. फेक न्यूवर चोप बसावा यासाठी सॉफ्टवेअर कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. सध्या देशभरातील ४ कंपन्यांना हे काम देण्यात आले आहे. यामध्ये औरंगाबाद येथील विनोद राठी यांच्या फॅक्ट क्रेसेंडो कंपनीसोबत इंडिया टुडे समूह, फॅक्टली न्यूज मोबाईल आणि विश्र्वास न्यूज या कंपन्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकचे महत्त्वाचे पाऊल

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. निवडणुकीदरम्यान, मोठ्या प्रमाणात फेक न्यूजचा प्रचार होतो. त्यामुळे या फेक न्यूजवर आळा घालता यावा, म्हणून फेसपबूकने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. फेसबुक फिल्टर सेंटर येथून बातम्यांवर संशोधन करुन त्या बातम्या फिल्टर केल्या जाणार आहेत. त्यामुळे आता फेसबुकवर जर फेक बातमी दिसली तर ती बातमी फेक आहे, हे लगेच माहिती पडणार आहे. यामध्ये दोषी आढळणारे पुन्हा फेसबुकवर दिसणार नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -