आता घरबसल्या करा RTO ची कामे, ‘या’ सेवा होणार फेसलेस

Faceless facility launched by RTO office
आता घरबसल्या करा RTOची मधील कामे, या सेवा होणार फेसलेस

वाहनासंबधीत आणि लायसन्स संबधीत कामे करण्यासाठी आरटीओ कार्यालयात चकरा माराव्या लागतात. मात्र, आता आरटीओमधील काही कामे घरबसल्या करता येणार आहेत परिवहन विभागात वाहनाच्या आणि लायसन्सच्या तीन तीन अशा एकून सहा सेवा फेसलेस होणार आहेत. मंत्री अनिल परब यांनी फेसलेस सेवेचा शुभारंभ नुकताच परिवहन आयुक्त कार्यालयात केला.

ही कामे होणार फेसलेस होणार –

1. आरटीओमधील वाहनांच्या या सेवा –

वाहन कागदपत्रांवरील पत्ता बदल
डुप्लिकेट आरसी बुक
स्थानांतर noc

2. लायन्ससच्या या सेवा –

पत्ता बदल
रिनीव्हल ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स
डुप्लिकेट लायसन्स

17 ते 18 लाख लोकांच्या आरटीओच्या फेऱ्या वाचणार –

या फेसलेस कामांमुळे सूमारे 17 ते 18 लाख लोकांच्या वर्षभारतील आरटीओच्या फेऱ्या वाचणार आहेत. पूर्वी या सुविधा ऑनलाइन होत्या. मात्र, एकदातरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी संबंधीत व्यक्तीला आरटीओ कार्यालयात जावे लागत असे . मात्र, या पुढे या सेवांसाठी आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज उरणार नाही. या सर्व सेवा ऑनलाइनच होणार आहेत.

हे होणार फायदे –

फेसलेस सेवेमुळे नागरिकांना आरटीओ कार्यालयात जाऊन एजंटला पैसे देण्याची गरज पडणार नाही. या निर्णयामुळे आरटीओ कार्यालयातील नागरिकांची गर्दी कमी होणार आहे. सध्या अनेक सेवांसाठी लागणाऱ्या क्लिष्ट कागदपत्रांमुळे नागरिकांना आरटीओ कार्यालयाच्या फेऱ्या मारव्या लगतात. काही नागरीक एजंट द्वारे काम करून घेतात. मात्र, आता नागरिकांना अँड्रॉईड मोबाईल किंवा संगणकाद्वारे आपली कामे करता येणार आहे. यासाठी त्यासाठी आधार कार्ड आणि लिंक असलेला मोबाईल क्रमांक सर्वाधिक महत्त्वाचा असणार आहे.