घरमहाराष्ट्रस्थानिक प्रशासन पुरवणार शाळांमध्ये सुविधा - शिक्षण सचिव

स्थानिक प्रशासन पुरवणार शाळांमध्ये सुविधा – शिक्षण सचिव

Subscribe

थर्मल गन, सॅनिटायझर , पल्स ऑक्सिमीटर यांसारख्या आवश्यक सुविधांची उपलब्धता करून द्यावी असे निर्देश शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी पत्राद्वारे दिले आहेत.

राज्यातील शाळांचे पहिल्या टप्प्यातील ९ वी ते १२ वी चे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू होत असून सर्व महानगरपालिका आयुक्त , जिल्हाधिकारी यांनी आपल्या क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होईल यादृष्टीने थर्मल गन, सॅनिटायझर , पल्स ऑक्सिमीटर यांसारख्या आवश्यक सुविधांची उपलब्धता करून द्यावी असे निर्देश शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी पत्राद्वारे दिले आहेत.

मुंबईमध्ये महापालिकेच्या ११२२ शाळा, खाजगी अनुदानित शाळा, वेगवेगळ्या बोर्डांच्या शाळा याशिवाय रात्रशाळा अशा मिळून १५०० पेक्षा जास्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. एकूणच २६०० पेक्षा अधिक शाळा व ६०,००० पेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळा असल्याने त्यांची सफाई व निर्जंतुकीकरण करण्यास वेळ लागणार आहे. मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सूचना अंमलात आणताना सॅनिटायझर, पल्स ऑक्झिमीटर आणि थर्मल गन यासारख्या बाबींची पूर्तता करण्यासाठी १७ ते २२ नोव्हेंबर हा कालावधी कमी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी ५ ते ६ दिवसांचा कालावधी फारच कमी आहे. त्यामुळे १७ ते २२ नोव्हेंबरदरम्यान शाळांची स्वच्छता, शिक्षक व शिक्षकेत्तरांची कोविड तपासणी करणे व इतर साधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आल्याचे शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी परिपत्राद्वारे स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -