Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Fact Check: कोरोना लस लोकांना 'मॅग्नेटिक' बनवित आहे? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे...

Fact Check: कोरोना लस लोकांना ‘मॅग्नेटिक’ बनवित आहे? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच आहे, अशातच देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव अटोक्यात आणण्यासाठी , सरकार लोकांना शक्य तितक्या लवकरात लवकर कोरोना लस देण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, कोविड -१९ या लसीसंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये असा दावा केला जात आहे की, कोरोना लस घेतल्यानंतर लोक ‘मॅग्नेटिक’ होऊ शकतात. म्हणजेच त्याच्या शरीरावर कोणतीही लोखंडी वस्तू चिकटल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये कोरोना लस घेण्याबाबात संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना सरकारने त्यास ‘खोटं’ असल्याचे म्हटले आणि लोकांना कोरोना साथीच्या रोगावर मात करण्यासाठी कोरोना लस घेण्याचे आवाहन केले.

बघा व्हिडिओ

- Advertisement -

या व्हायरल व्हिडिओमध्ये, लस घेतलेल्या हातावर धातूच्या वस्तू चिकटलेल्या दिसत आहे आणि हाच व्हिडिओ खूप व्हायरल केला जात आहे. यानंतर लसीच्या सुरक्षिततेविषयी अफवा मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसतेय. यासंदर्भात सांगताना प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (पीआयबी) फॅक्ट चेकने म्हटले आहे की, कोरोना लसी संदर्भातील हे दावे निराधार आहेत. ही लस मानवी शरीरात चुंबकत्व निर्माण करत नाही. कोविड लस पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्यात कोणताही धातू नसल्याचेही म्हटले आहे.

- Advertisement -

पीआयबी पुढे असेही म्हटले- “कोरोना लस घेतल्यावर, सुई घेतलेल्या ठिकाणी दुखणं, डोकेदुखी, शरीर दुखणं आणि सौम्य सूज आणि ताप येऊ शकतो. कोरोना लसविषयी चुकीच्या माहितीकडे लक्ष देऊ नका आणि कोरोनाची लस घेतली नसेल ती लवकरात लवकर घ्या.

- Advertisement -