अमृता फडणवीसांकडून राज्यपालांची पाठराखण; म्हणाल्या, मराठी बोलण्याच्या ओघात…

fadanvis wife amruta fadanvis took the governor bhagat singh koshyari side controversy statement

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच चिघळले आहे. ठाकरे गटासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या प्रकरणावरून राज्यपालांचा जाहीर निषेध करत राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र राज्यपालांच्या वक्तव्याची भाजप नेत्यांकडून सारवासावर केली जात आहे.
यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची पाठराखण केली आहे. राज्यपाल मराठी बोलण्याच्या ओघात जे बोलले त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि विविध सामाजिक संघटनांनी या प्रकरणी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली. अशात अमृता फडणवीस यांनी बाजू घेतल्याने या प्रकरणाला नवं वळणं मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीवर प्रेम करणारे राज्यपाल आहेत. मराठी बोलण्याच्या ओघात जे बोलले त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. असे अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

दरम्यान आता योगगुरू रामदेव बाबा यांनी देखील आज महिलांविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे,रामदेव बाबांनी हे वक्तव्य ज्या कार्यक्रमात केले त्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या.  महिला साडी आणि सलवार सूटमध्ये छान दिसतात. काही घातलं नाही तरी छान दिसतात, असं वादग्रस्त वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केलंय. एवढंच नव्हे तर, अमृता फडणवीस १०० वर्षे तरुण राहतील, असंही ते म्हणाले. ठाण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.


राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ यशस्वी करणाऱ्यांचे नाना पटोले, थोरातांनी पत्राद्वारे मानले आभार