Homeदेश-विदेशFadnavis about Lalu : नितीश कुमारांबद्दल लालूप्रसादांनी केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Fadnavis about Lalu : नितीश कुमारांबद्दल लालूप्रसादांनी केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Subscribe

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशा गोष्टींमध्ये काही तथ्य नाही, ही मुंगेरीलालची स्वप्नेच बनून राहतील.

(Fadnavis about Lalu) मुंबई : गेली जवळपास 18 वर्षे धरसोडीचे राजकारण करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नेते लालूप्रसाद यादव यांनी वक्तव्य केले आहे. त्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील ‘यात काहीही तथ्य नाही,’ असे म्हटले आहे. (Fadnavis’s reaction to Lalu Prasad’s statement about Nitish Kumar)

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेडने भाजपाबरोबरची युती अनेकदा तोडून पुन्हा त्यांच्याशी सूत जुळवून घेतले आहे. गेल्या सुमारे 18 वर्षांत नितीश कुमार यांचे राजकारण हे कायम धरसोडीचेच राहिले आहे. विशेष म्हणजे, या धरसोडीच्या राजकारणातदेखील आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची टिकवून ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. याच पार्श्वभूमीवर लालूप्रसाद यादव यांनी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये नितीश कुमार यादव यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

हेही वाचा – Lalu Prasad Yadav : नितीश कुमारांसाठी आमचे दरवाजे…, आदित्य ठाकरेंपाठोपाठ लालू प्रसादांचे सूचक विधान

‘इंडि’ आघाडीचे दरवाजे नितीश कुमार यांच्यासाठी खुले आहेत. नितीश कुमार यांनी सोबत येऊन काम करावे. नितीश कुमार यांना सोबत यायचे असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करू. नितीश कुमार यांनी आमच्यासोबत यावे आणि मिळून काम करावे. त्यात कुठलीही अडचण येणार नाही, असे लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘आपलं महानगर – माय महानगर डॉट कॉम’चे संपादक संजय सावंत यांनी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते, आमदार आदित्य ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी नितीश कुमार यांच्याबद्दल असेच सूचक विधान केले होते. जदयूचे नितीश कुमार पुढच्या तीन-चार महिन्यांत आमचे मित्र बनतील, हे भाजपाला कळणारदेखील नाही, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. त्यापाठोपाठ लालूप्रसाद यादव यांचे हे वक्तव्य समोर आले आहे.

तथापि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लालूप्रसाद यादव यांचा खरपूस समाचार घेतला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशा गोष्टींमध्ये काही तथ्य नाही, ही मुंगेरीलालची स्वप्नेच बनून राहतील. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) सर्व घटक पक्ष एकत्र आहेत. एनडीएमध्ये फूट पडू पाहणाऱ्या विरोधी पक्षांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत, असेही ते म्हणाले. (Fadnavis about Lalu: Fadnavis’s reaction to Lalu Prasad’s statement about Nitish Kumar)

हेही वाचा – Kumar Vishwas about Kareena Kapoor : कुमार विश्वास यांच्या निशाण्यावर करिना कपूर, म्हणाले…