घरमहाराष्ट्रफडणवीस पुन्हा मुख्यमंत्री, दादा उपमुख्यमंत्री

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री, दादा उपमुख्यमंत्री

Subscribe

राष्ट्रवादीतील आमदारांच्या पत्रासह अजित पवार भाजपसोबत
रात्रीस खेळ चाले, महाराष्ट्रावर फर्जिकल स्ट्राइक -उद्धव ठाकरे
विधानसभेत भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही -शरद पवार
३० नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवारांची अग्निपरीक्षा
संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली -चंद्रकांतदादा पाटील
भाजपच्या अंताची सुरूवात महाराष्ट्रातूनच होणार -संजय राऊत
सत्तेसाठी भाजपने निर्लज्जपणाची सीमा ओलांडली -अहमद पटेल
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि पवार कुटुंबात फूट -सुप्रिया सुळेे
विधिमंडळ गटनेतेपदावरून अजित पवार यांची हकालपट्टी

महाराष्ट्रात सत्तास्थापनेची कोंडी महिनाभरापासून सुरू असताना राष्ट्रपती राजवट शनिवारी पहाटे 5.47ला हटवून राजकीय भूकंप घडला आणि त्याचा केंद्रबिंदू राजभवन ठरले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येणार हे शुक्रवारी संध्याकाळी निश्चित झाले होते. मात्र रात्रीची मध्यरात्र झाली आणि राजभवनात रात्रीस खेळ सुरू झाला…या खेळाला असा काही रंग चढला की शनिवारी पहाटे राज्यातील जनता झोपेतून जागे होण्याआधी ‘मी पुन्हा आलोय…’ असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनीच दुसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी पक्षाविरोधात बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

- Advertisement -

या सत्ता संघर्षामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. या नाट्यानंतर शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत वाय बी चव्हाण सेंटरमध्ये प्रसारमाध्यमांना सामोरे जात भाजपला विधानसभेत बहुमत सिद्ध करता येणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर सकाळी अजित पवार यांच्यासोबत राजभवनावर शपथविधीला गेलेले बहुतांशी आमदार एक एक करत पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतले. शिवसेनेने सर्व आमदारांना ललित हॉटेलमध्ये ठेवले असून काँग्रेसने त्यांचे आमदार भोपाळच्या दिशेने हलवले आहेत. दरम्यान अजितदादा यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी केली असून त्यांच्या जागी जयंत पाटील यांची निवड केली आहे.

दादांसोबत राजभवनावर
आ. दौलत दरोडा, शहापूर
आ. नरहरी झिरवळ, दिंडोरी
आ. सुनील भुसारा, विक्रमगड
आ. दिलीप बनकर, निफाड
आ. अनिल पाटील, अमळनेर
आ. नितीन पवार, कळवण
आ. सुनील शेळके, मावळ
आ. बाबासाहेब पाटील, अहमदपूर
आ. संजय बनसोड, उदगीर

- Advertisement -

सरकार बहुमत सिद्ध करेल
शिवसेनेमुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होती. भाजप आणि शिवसेनेला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही राज्यात महिन्याभरात सरकार स्थापन झाले नाही. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी पाठिंबा आम्हाला दिला आणि आम्ही ३० नोव्हेंबरला बहुमत सिद्ध करून दाखवू.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

स्थिर सरकारसाठी निर्णय
महाराष्ट्रात शेतकर्‍यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि काँग्रेससोबतची चर्चा संपतच नव्हती त्यामध्ये नको नको त्या गोष्टींची मागणी वाढत चालली होती. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. योग्य वेळी मी सविस्तर बोलेन.
-अजित पवार, उपमुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -