घरताज्या घडामोडीपूरग्रस्तांना पोकळ आश्वासनं नको, प्रत्यक्ष मदत करा- फडणवीसांचं ठाकरे सरकारला आवाहन

पूरग्रस्तांना पोकळ आश्वासनं नको, प्रत्यक्ष मदत करा- फडणवीसांचं ठाकरे सरकारला आवाहन

Subscribe

मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे.

अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले असून जमीनी देखील नापीक झाल्या आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. यामुळे शेतकऱ्यांना केवळ आश्वासने न देता प्रत्यक्षात मदत करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाही याबाबतची काळजी देखील राज्य सरकारने घेतली पाहिजे. विदर्भात आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत राज्य सरकारकडे विनंती केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही. अशात मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात 436 लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे असे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे. आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

- Advertisement -

१७ लाख हेक्टर जमीनीचे नुकसान

लातूर नंदुरबार, उस्मानाबादल जळगावमध्ये मदतीसाठी एनडीआरएफ पथक पाठवण्यात आले आहे. उस्मानाबादमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीने लोकांना रेस्क्यू करण्यात आले. जळगावला एसडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. या महिन्यात ७१ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. विशेष करुन २६ लोक जखमी झाले आहेत. ९७ जनावरांचा मृत्यू वीज पडल्यामुळे झाला आहे. कच्चा घरांची पडझड झाली आहे. १७ लाख हेक्टर जमीनीचे नुकसान सरासरी ८१ ट्कके पंचनामे झाले आहेत. संततधार पावसामुळे पंचानम्यांमध्ये अडचणी आल्या सध्या १९ टक्के पंचनामे उर्वरित आहेत. गुलाब चक्रीवादळाची माहिती अद्याप येत आहेत. पुन्हा पंचनामे करण्यात येतील यामध्ये २२ लाख हेक्टर जमीनीचे नुकसान झालं आहे. प्रचंड मोठं नुकसान आहे.


हेही वाचा : मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -