घरताज्या घडामोडीअनिल देशमुखांना नैतिकता पहिल्या दिवशीच आठवायला हवी होती - फडणवीस

अनिल देशमुखांना नैतिकता पहिल्या दिवशीच आठवायला हवी होती – फडणवीस

Subscribe

नैतिकता पहिल्या दिवशी आठवायला पाहिजे होती परंतु आता जर आठवली असेल न्यायालयाच्या निर्णयानंतर तर त्याचे स्वागतच आहे

हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर हे आपेक्षित होते की राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे तशा प्रकारच्या राजीनामा दिल्याचे समजते आहे. मला असे वाटते की हा राजीनामा देण्याकरता उशीर झाला आमची आपेक्षा अशी होती की गंभीर आरोप लागल्यानंतर आणि रश्मी शुक्लांचा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर तात्काळ अनिल देशमुख यांचा राजीनामा राष्ट्रवादी पक्षाने आणि शरद पवारांनी घ्यायला पाहिजे होता. हा राजीनामा झाला असलात तरी एक कोड पडले आहे की इतक्या भयावह घटना महाराष्ट्रात झाल्या कधी नव्हे मंत्र्यांपासून ते पोलिसांपर्यंत आरोप करण्यात आले परंतु राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक चकार शब्द का बोलत नाहीत. अद्यापही त्यांना कुठलीही प्रतिक्रिया का दिली नाही या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचे मौन हे मात्र अस्वस्थ करणारे आहे. त्यामुळे मला असे वाटते की या प्रकरणात प्रतिक्रिया यायला पाहिजे होती असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

फडणवीस यांनी पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटची प्रतिक्रिया दिली होती ती मला आठवत आहे ती वाझे काय लादेन आहे का? या प्रतिक्रिया नंतर तो लादेन आहे, दाऊद आहे की आणखी काय आहे हे मला अजिबात कळले नाही त्यामुळे मुख्यमंत्री का बोलत नाही ते मला अद्याप कळले नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

राज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आणि सकार जेव्हा अडचणीत असते त्यापरिस्थितीला सामोरे जाऊन मुख्यमंत्र्यांनी जनतेला आश्वस्त करायचे असते. चूक झाली असेल तर आम्ही ती सुधारू किंवा आमचे ह्याच्यावर हे म्हणणे आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले पाहिजे.

अनिल देशमुख यांनी पत्रात काहीही म्हटले असले तरी त्यावर बोलून फायदा नाही. नैतिकता पहिल्या दिवशी आठवायला पाहिजे होती परंतु आता जर आठवली असेल न्यायालयाच्या निर्णयानंतर तर त्याचे स्वागतच आहे असे फडणवीसांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सीबीआय कोणाला अटक करेल आणि नाही करणार याबाबत सीबीआय स्वतः सांगू शकेल परंतु एका सिटींग होममिनीस्टरच्या संदर्भात जेव्हा सीबीआय चौकशी कोर्ट सांगते त्यावेळी त्यांना त्या पदावर राहता येत नाही. कारण एक प्रकारचा कॉन्स्टिट्यूशनल कॉन्फ्लेक्ट हा त्यातून निर्माण होतो एक यंत्रणा पदावरच्या चौकशी कशी करेल जो स्वतः चौकशीचा कस्टोडीयन आहे. म्हणुन राजीनामा देण्याशिवाय पर्याय उरला नव्हता असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

संजय राठोड प्रकरणावर बोलताना फडणवीस यांनी म्हटले आहे की, नैतिकता शिल्लक आहे का असा प्रश्न विचारावा लागेल राठोडांच्या राजीनाम्यानंतर आणि राजीनाम्याच्या अगोदर पोलीसांचा व्यवहार दिसतो आहे. अशा प्रकारचा व्यवहार पाहूनच सीबीआयकडे हे प्रकरण उच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे असेच वागत राहिले तर आणखी प्रकरणे सीबीआयकडे दिल्याशिवाय राहणार नाही असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.


हेही वाचा : गृहमंत्र्यांनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे, फडणवीसांची मागणी


Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -