घरमहाराष्ट्रफडणवीस, दरेकर, डावखरेही दिल्लीत

फडणवीस, दरेकर, डावखरेही दिल्लीत

Subscribe

प्रदेशाध्यक्ष किंवा संघटनात्मक बदलांची शक्यता भाजप नेत्यांकडून मात्र फेटाळण्यात आली

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत. त्यांच्या पाठोपाठ रविवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, निरंजन डावखरेही दिल्लीत पोहोचले आहेत. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची दिल्ली दरबारी होणारी खलबते लक्षात घेता मोठ्या राजकीय हालचालींची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर राज्यात भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष किंवा संघटनात्मक बदलांची शक्यता भाजप नेत्यांकडून मात्र फेटाळण्यात आली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील खासदारांची उद्या बैठक होणार आहे. नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांसोबतही एक बैठक पार पडणार आहे. त्यात महाराष्ट्रातील प्रश्नांबाबत चर्चा होईल, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिल्लीत दाखल झाल्यानंतर दिली आहे. दरम्यान, अमित शाह यांच्यासोबतही एक बैठक होणार आहे का? असा प्रश्न विचारला असता, अमित शाह यांच्यासोबत बैठक आहे की नाही, याची माहिती आपल्याला नसल्याचे त्यांनी सांगितले. मला फक्त रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी होणार्‍या बैठकीची माहिती आहे, असे दरेकर म्हणाले.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील कालपासून दिल्लीत आहेत. आज त्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा फक्त मीडियात आहेत. आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. खरे तर भाजप काय आहे हे तुम्हाला कळले नाही. सर्वसामान्य माणसांनाही भाजप समजली पाहिजे, असे सांगतानाच दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो. अगदी ग्रासरुटच्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत हा बदल होत असतो, असे पाटील म्हणाले. काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळत नाही. भाजपमध्ये तसे नाही. त्यामुळे भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या या निव्वळ चर्चा असून त्यात काही तथ्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -