घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रवारिशे हत्येत फडणवीसांचा संबंध नाही : गिरीश महाजन

वारिशे हत्येत फडणवीसांचा संबंध नाही : गिरीश महाजन

Subscribe

नाशिक : पत्रकार शशिकांत वारिसेंच्या हत्येप्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काहीही संबंध नसल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. भाजप सरकारच्या काळात दिवसाढवळ्या कोणी कायदा सुव्यवस्था मोडत असेल तर त्याला शिक्षा होणारच, असा इशारा त्यांनी दिला.

ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वाधिक पत्रकारांचे हाल झाले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्पाबाबत बोलावे व त्यानंतर पत्रकाराची हत्या व्हावी याचा काहीही संबंध नाही. भाजप सरकारच्या काळात दिवसाढवळ्या कोणी कायदा सुव्यवस्था मोडत असेल तर त्याला शिक्षा होणारच. असे महाजन म्हणाले. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत ‘महाविकास आघाडी’ राहते की नाही? तसेच निवडणूक लढवण्याचा तिन्ही पक्षाचा वेगवेगळा निर्णय आहे. त्यामुळे आम्ही सध्या त्यांची फक्त गंमत पाहतोय. राज्यात लवकरच काँग्रेस व राष्ट्रवादीची अवस्था शिवसेनेसारखी होईल त्याची सुरुवात काँग्रेसमध्ये दोन गट पडून झाली असे विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. ते नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते.

- Advertisement -

नाशिकमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीच्या निमित्ताने महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आत्ताच्या परिस्थितीमध्ये राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकते. कारण, काँग्रेसमध्ये आत्ताच दोन गट पडलेत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात एक गट मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसला कंटाळलेत. राज्यातील महाविकास आघाडीचे तीन तेरा वाजले असून कोण केव्हा बाहेर पडेल हे सांगता येत नाही ’महाविकास आघाडी’मधील काँग्रेस व राष्ट्रवादीची अवस्था शिवसेनेसारखी होईल असे भाकित महाजन यांनी व्यक्त केले.

मविआचे तीन तेरा

महाविकास आघाडीतले दहा ते २० आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत, असे विधान शुक्रवारी आमदार बच्चू कडू यांनी केले होते. त्यावर बोलताना महाजन म्हणाले की, आता राज्यात काहीही होऊ शकते, लोकं आता काँग्रेसला कंटाळलेत, शिवसेनेत दहा-बारा आमदार राहिलेत, महाविकास आघाडीचे तीनतेरा वाजले आहेत. या तिन्ही पक्षातून कोण केव्हा बाहेर पडेल हे काहीही सांगता येणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -