घरताज्या घडामोडीFadnavis on Ashok Chavan : फडणवीसांनीच दिले चव्हाणांच्या राज्यसभेचे संकेत

Fadnavis on Ashok Chavan : फडणवीसांनीच दिले चव्हाणांच्या राज्यसभेचे संकेत

Subscribe

मुंबई : होणार होणार म्हणताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा मंगळवारी भाजपात प्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार आणि अन्य प्रमुख भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीच चव्हाण यांना राज्यसभेत पाठवण्याचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा – Ashok Chavan : अशोक चव्हाण यांची योग्य ठिकाणी मदत घेणार – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

सोमवार, १२ फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू झाली. तसेच अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेवर संधी दिली जाईल, अशी अटकळ अनेकांनी बांधली. मंगळवारी भाजपात प्रवेश झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सहाजिकच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट हो किंवा नाही असे उत्तर न देता हा निर्णय केंद्रीय भाजपा घेईल असे सांगितले. मात्र, हे सांगतानाच अशोक चव्हाण हे ज्येष्ठ नेते असून राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची त्यांची योग्यता आहे, असे सांगत त्यांनी राज्यसभेचे संकेत दिले आहेत.

काय म्हणाले फडणवीस?

अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश झाला, आता त्यांची जबाबदारी काय असेल, असा प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी हा निर्णय केंद्रीय भाजपा घेईल असे सांगितले. अशोक चव्हाण हे दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांच्या येण्याने राज्याला निश्चितच फायदा होणार आहे, मात्र, अशोक चव्हाणांसारख्या ज्येष्ठ नेत्याची योग्यता ही देश पातळीवर काम करण्याची आहे. त्यामुळे त्यांच्या संदर्भातील कोणताही निर्णय हा केंद्रीय पातळीवरच घेतला जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : उनका भी हमें इंतजार; ‘त्या’ प्रश्नावर फडणवीसांचे सूचक वक्तव्य

अशोक चव्हाण भाजपात जाणार या चर्चेपाठोपाठच ते भाजपकडून राज्यसभा लढवतील, अशी चर्चा सुरू झाली होती. त्याबाबत फडणवीसांनी थेट काहीही सांगणे टाळले असले तरी संकेत नक्कीच दिले आहेत. भाजपाची राज्यसभेची यादी मंगळवारी उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -