घरमहाराष्ट्रपुणेFadnavis On Raut : कोण संजय राऊत ? देवेंद्र फडणवीसांचा थेट सवाल

Fadnavis On Raut : कोण संजय राऊत ? देवेंद्र फडणवीसांचा थेट सवाल

Subscribe

पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर शुक्रवारी (9 फेब्रुवारी) भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.

आळंदी : कोण संजय राऊत? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे देवेंद्र फडणवीस हे गीता भक्ती अमृत महोत्सव उपस्थिती होते. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.

पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी गुंडाची परेड काढली होती. ज्या पद्धतीने पत्रकार निखली वागळेंवर हल्ले करणारांची परेड काढणार का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केल आहे. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कोण संजय राऊत? ते कोण आहेत? ते फार मोठे नेते आहेत का? योग्य नेते असतील तर, त्यांच्याबद्दल मला विचारायचे. संजय राऊत यांच्याबद्दल काय विचारताय? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारला विचारला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Ganpat Gaikwad : गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाडला अटक; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

 

- Advertisement -

आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या निलंबनावर फडणवीस म्हणाले….

काँग्रेसमधील काही नेते प्रभू रामाचा द्वेष करता आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आचार्य प्रमोद कृष्णम यांना पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित केले आहे. आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या निलंबिनाच्या कारवाईवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला वाटते की, त्यांची एक चूक आहे. आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटले की, तुम्ही रामाचा आणि राम मंदिराचा विरोध करू नका, असे म्हणणे हे त्यांच्यासाठी चुकीचे ठरले. यानंतर काँग्रेस त्यांना पक्षाकडून काढून टाकले. कारण काँग्रेसची हिट निती आहे, हा तोच पक्ष आहे की, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देताना रामाच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. भाजपाचा विरोध करता करता तुम्ही राम विरोधी होऊ नका, असा सल्ला आचार्य यांनी दिली होती. बहुदा आचार्यांचा हाच सल्ला काँग्रेसच्या जिव्हारी लागला”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

संजय राऊत नेमके काय म्हणाले

पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर शुक्रवारी (9 फेब्रुवारी) भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. राष्ट्र सेवा दल येथील हॉलमध्ये नियोजित निर्भय सभेला जात असताना निखिल वागळेंच्या भाजपाकडून गाडीवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यावर संजय राऊत म्हणाले, पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी गुंडांची परेड काढून मोठा शो केला होता. पण आता निखिल वाळेंवर हल्ला करणाऱ्यांची परेड कधी काढणार? असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -