घरमहाराष्ट्रFadnavis On Thackeray : "उद्धव ठाकरे टीका नाही, तर गरळ ओकत आहेत",...

Fadnavis On Thackeray : “उद्धव ठाकरे टीका नाही, तर गरळ ओकत आहेत”, देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

Subscribe

'गाव चलो' अभियानअंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 7 फेब्रुवारीला नागपुरातील पारडसिंगातील नागरिकांशी संवाद साधणार आहे. यावेळी गावाच्या प्रगती आणि परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

मुंबई : ‘उद्धव ठाकरे हे टीका करत नाही, तर ते गरळ ओकत आहेत’, असे प्रत्युत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाने केलेली विकास कामे ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘गाव चलो’ अभियान सुरू करणार आहे. ‘गाव चलो’ अभियान 4 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सध्या उद्धव ठाकरे हे रायगड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे घेतलेल्या सभेतून भाजपावर हल्लाबोल करत आहे.

रायगड दौऱ्यादरम्यान घेतलेल्या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली आहे? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे हे टीका करत नाही, तर ते गरळ ओकत आहेत,” असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे. महायुतीच्या जागावाटपावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझी अद्यापही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली नाही. मी, मुख्यमंत्री आणि अजित पवार आम्ही तिघे एकत्रित बसून रणनीती ठरवू आणि त्या आधारे काम करू.”

- Advertisement -

हेही वाचा – Bhujbal On Gaikwad : छगन भुजबळांचा संजय गायकवाडांना टोला; “ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात…”

फडणवीस नागपुरातील ‘या’ नागरिकांशी संवाद साधणार

‘गाव चलो’ अभियानअंतर्गत तुम्ही सुद्धा गावात जाऊन राहणार आहात, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे दिली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “यापूर्वी भाजपामध्ये ‘गाव चलो’ अभियान आणि ‘घर चलो’ अभियान राबविले होते. आता पुन्हा नव्याने आम्ही ते अभियन राबवणार आहोत. यावेळी देशातील रिकॉर्ड असेल की, कोणत्याही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते हे 100 टक्के गावापर्यंत पोहचतील आणि त्या गावात राहतील. एका प्रकारे पंतप्रधान मोदींचे स्वप्न होते की, आपला कनेक्ट हा शेवटच्या माणसापर्यंत आणि तळागळातील लोकांची असला पाहिजे. ते गाव चलो अभियानाच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न करत आहोत.” या अभियानाअंतर्गत देवेंद्र फडणवीस हे 7 फेब्रुवारीला नागपुरातील पारडसिंगातील नागरिकांशी संवाद साधणार आहे. यावेळी गावाच्या प्रगती आणि परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Uddhav Thackeray : स्वप्नातले पालकमंत्री जॅकेट शिवून थकली पण…; उद्धव यांचा गोगावलेंना चिमटा

जेपी नड्डाच्या भेटीबाबत फडणवीस म्हणाले…

राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे. याबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जे. पी. नड्डा हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असून आम्ही त्यांच्याशी नेहमीच चर्चा करत असतो. मी जे. पी नड्डा यांच्याकडून लोकसभा निवडणुकीसाठी काही गाईडलाईन्सबाबत माहिती घेतली आहे. त्याचबरोबर आमचे युती आणि इतर गोष्टींबाबत आम्हाला त्यांच्याशी चर्चा झाली आहे”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -