घरमहाराष्ट्र'मी दोन्ही मेळाव्यांची भाषणं ऐकणार नाही' म्हणत फडणवीसांनी लगावला उद्धव ठाकरेंना टोला

‘मी दोन्ही मेळाव्यांची भाषणं ऐकणार नाही’ म्हणत फडणवीसांनी लगावला उद्धव ठाकरेंना टोला

Subscribe

''दोन्ही दसरा मेळावे अत्यंत व्यवस्थित पार पडतील. कायदा आणि सुव्यवस्था यांचं कठोर पालन सुद्धा केलं जाईल. मात्र जी परिस्थिती आहे त्याकडे कुणीही दुर्लक्ष करून चालणार नाही. गर्दीचा फायदा घेऊन कुणीही देशविघातक कृत्य करू नये. नाहीतर कडक कारवाई केली जाईल'' असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिवसेनेतील(shivsena) ठाकरे गट आणि शिंदे(cm eknath shinde) गट दोघंही 5 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा घेणार आहेत. दोन्ही गटांकडून शक्ती प्रदर्शन सुरू आहे. दरम्यान या दोन्ही दसऱ्या मेळाव्यांकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागून राहीलं आहे. त्याच बरोबर राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चा सुरु आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (dcm devendra fadanvis) यांनी सुद्धा दोन्ही दसरा मेळाव्यांवर प्रतिक्रिया देत फडणवीस म्हणाले की, ”मी दोन्ही भाषणं ऐकणार नाही” यामागे नेमकं कारण काय आहे हे सुद्धा फडणवीस यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा – ‘5 जी’ आले, पण अर्थकारण बिघडले; शिवसेनेचे ‘सामना’तून मोदी सरकारवर शरसंधान

- Advertisement -

दरम्यान सोमवारी रात्री काळा चौकी येथील मराठी दांडियाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(dcm devendra fadanvis) यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ”यावर्षी शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे दोघांचाही दसरा मेळावा होणार आहे. पण मी दोन्ही मेळाव्यांमधली भाषणं ऐकणार नाही. त्यावेळी मी नागपुरात धम्म चक्र परिवर्तन कार्यक्रमात सहभाग घेणार आहे”. त्याच संदर्भात फडणवीस म्हणाले, ”दोन्ही दसरा मेळावे अत्यंत व्यवस्थित पार पडतील. कायदा आणि सुव्यवस्था यांचं कठोर पालन सुद्धा केलं जाईल. मात्र जी परिस्थिती आहे त्याकडे कुणीही दुर्लक्ष करून चालणार नाही. गर्दीचा फायदा घेऊन कुणीही देशविघातक कृत्य करू नये. नाहीतर कडक कारवाई केली जाईल” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा –  मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे घेणार जाहीर सभा, टेंभी नाक्यापासून होणार महाप्रबोधन यात्रेला सुरुवात

- Advertisement -

”सभेतील भाषणं योग्य भाषेत होणं सुद्धा अपेक्षित आहेत. भाषण खुसखुशीत करता येतं. पण कोणाची अवमानकारक वक्तव्य त्यात नसावीत. काही चुकीची वक्तव्य करण्यात आली तर कायदा त्याच काम करेल”. असा इशारा देत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

दरम्यान नाना पटोले यांनी चित्त्याबद्दल जे वक्तव्य केले होते त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ”चित्ते कुठून आलेत, हेही नाना पटोलेंना नीट माहित नाही. चर्चेत राहण्यासाठी पाटोले असं वक्तव्य करत असतात. नाहीतर त्यांना कोणीच विचारणार नाही, पण नाना पाटोलेंच्या वक्तव्यांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही, असा टोलासुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -