घरमहाराष्ट्रFadnvis Vs Congress : काँग्रेसमध्ये कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही; फडणवीसांचा टोला

Fadnvis Vs Congress : काँग्रेसमध्ये कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही; फडणवीसांचा टोला

Subscribe

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी (12 फेब्रुवारी) काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी अशोक चव्हाण यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे. यावेळी अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक अमर राजूरकर यांनीही आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसमध्ये कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, असा टोला लगावला आहे. (Fadnavis Vs Congress No one can find any solution in Congress Devendra Fadnavis)

हेही वाचा – Maharashtra Politics : उनका भी हमें इंतजार; ‘त्या’ प्रश्नावर फडणवीसांचे सूचक वक्तव्य

- Advertisement -

भाजपाला पक्ष तोडल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही, असा आरोप काँग्रेसचे नेते करत आहेत? या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझा त्यांच्यावर उलट आरोप असा आहे की, त्यांना त्यांचा पक्ष सांभाळत येत नाही. त्यांना त्यांच्या पक्षातील नेते सांभाळत येत नाहीत. त्यांना त्यांच्या पक्षामध्ये मोट बांधता येत नाही. कारण कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. आज हे सर्व मोठे नेते इतक्या वर्षांची त्यांच्या पक्षाची पूण्याई सोडून आमच्यासोबत का येत आहेत? याचं कारण आहे की, आज काँग्रेसमध्ये जे वातावरण आहे. आज काँग्रेसमध्ये पक्ष कुठल्या दिशेने चालली आहे, हेच कुणाला समजत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – Jalgaon : पैशांच्या देवाणघेवाणीतून आधी राडा नंतर तुफान दगडफेक; परिसराला छावणीचं स्वरुप

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय जनता पार्टीला विरोध करताना आपण देशाच्या विकासाला कधी विरोध करायला लागलो, हे त्यांना (काँग्रेस) समजत नाही आहे. जे मोठे नेते ज्यावेळेस दृष्टीक्षेप टाकतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की, आपण काय करतो आहोत. आपलं नेतृत्व काय करतं आहे. मग त्यापेक्षा देशाच्या मुख्य धारेमध्ये आपण जायला पाहिजे, म्हणून लोकं आमच्यासोबत येतात. त्यामुळे पहिलं त्यांनी (काँग्रेस) आत्मचिंतन केलं पाहिजे. त्यांना घर का सांभाळता येत नाही? ज्यांनी काँग्रेस मोठी केली, ज्यांनी काँग्रेसला आपलं सर्वेस्व दिलं, अशा नेत्यांना का आपल्याला सांभाळत नाही? याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -