Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Failure Party : नापास विद्यार्थ्यांसाठी पार्टी; औरंगाबाद पालिका होती आयोजक

Failure Party : नापास विद्यार्थ्यांसाठी पार्टी; औरंगाबाद पालिका होती आयोजक

Subscribe

 

औरंगाबादः १२ परिक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी औरंगाबाद महापालिकेने खास पार्टाचे आयोजन केले होते. या पार्टीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यांचे मनोबल वाढवण्यात आले. एवढचं काय तर या मुलांनी गाण्यावर ठेकाही धरला.

- Advertisement -

या पार्टीचे आयोजन औरंगाबादचे महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी केले होते. या पार्टीत ५० मुले सहभागी झाली होती. पार्टीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबाच फुल देऊन स्वागत करण्यात आलं. १२ परिक्षेत नापास होऊनही जीवनात यशस्वा झालेल्यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. त्यानंतर पार्टी झाली. पार्टीत नापास झालेले विद्यार्थी नाचले. त्यांच्यासोबत आयुक्त जी श्रीकांतही नाचले. या पार्टीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळाल्याची चर्चा होती. या पार्टीचे कौतुकही झाले.

HSC Result : कोकण विभाग अव्वल, मुंबईतून निराशा

बारावीमध्ये कोकण मंडळाने बाजी मारत सर्वाधिक टक्केवारी मिळवली आहे. तर नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बारावीच्या परिक्षेत बाजी मारली आहे. यंदाच्या वर्षी राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले होते. त्यामुळे राज्याचा एकूण निकाल हा 91.25 टक्के लागला आहे. तर गेल्या वर्षीपेक्षा 2.97 टक्क्यांनी निकाल घसरल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडून देण्यात आलेली आहे. यावर्षी परीक्षेला 14 लाख 28 हजार 194 विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी करण्यात आलेली होती. यातील 14 लाख 16 हजार 371 प्रत्यक्ष विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यांतील 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या परीक्षेत नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 93.73 टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल 89.14 टक्के इतका लागला आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा पाच टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 4.59 टक्के अधिक मुली यावर्षी उत्तीर्ण झाल्या आहेत. कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला असून मुंबईचा निकाला 88.13 टक्के लागला आहे. तर 154 विषयांपैकी 23 विषयांचा 100 टक्के निकाल लागला आहे.

आजपासून मिळाली गुणपत्रिका

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या होत्या. 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार आजपासून गुणपत्रिका मिळण्यास सुरुवात झाली आहे.

कॉपीमुक्त अभियान

दहावी, बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले होते. त्याअंतर्गत जनजागृती मोहीम तर राबविण्यात आली. यासाठी पोलिसांची मदत देखील घेण्यात आली होती. परीक्षा केंद्राच्या 50 मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तींना प्रवेश देण्यात आला नाही. अतिसंवेदनशील, संवेदनशील, सर्वसाधारण असे परीक्षा केंद्रांचे वर्गीकरण करण्यात आले होते. कलम 144 म्हणजेच जमावबंदीच्या अंतर्गत प्रतिबंधकात्मक आदेश देण्यात आले होते. तसेच परीक्षा केंद्रांच्या 50 मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तरीही काही ठिकाणी कॉपीचे प्रकार झाले.

 

- Advertisment -