घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांचे ते फलक शहरात लागलेच नाहीत; खोडसळपणा करणाऱ्यांचा शोध सुरु

मुख्यमंत्र्यांचे ते फलक शहरात लागलेच नाहीत; खोडसळपणा करणाऱ्यांचा शोध सुरु

Subscribe

सेना आणि भाजपा या पक्षात सत्तास्थापनेवरून मतभेद दिसत असून शिवसेना नेते संजय राऊत हे भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच 'संजय भाऊ आय एम सॉरी', त्यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले फलक पिंपरी-चिंचवड शहरात असल्याचे वायरल झाले होते.

सेना आणि भाजपा या पक्षात सत्तास्थापनेवरून मतभेद दिसत असून शिवसेना नेते संजय राऊत हे भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच ‘संजय भाऊ आय एम सॉरी’, त्यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले फलक पिंपरी-चिंचवड शहरात असल्याचे वायरल झाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती, मात्र हे फलक लावले नसल्याचे समोर आता आले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे असलेल्या स्पॉट १८ येथे मुख्यमंत्र्यांचे फलक लागल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, असं काही नसल्याचे समोर आले आहे. वायरल झालेले फोटो हे खोटे आहेत. बनावट असून असा खोडसाळपणा कोणी केला आहे, हे पाहावे लागेल, असे म्हणत एका भाजपा नगरसेवकाने मुख्यमंत्र्यांबद्दल टिपण्णी करणारे फलक लावणाऱ्यांवर पत्रकाद्वारे कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे वाकड पोलिसांचीदेखील धावपळ झाली आहे. मात्र, फलक लावले नसल्याचे समोर आल्याने भाजपा नगरसेवकाची गोची झाली आहे.

- Advertisement -

फलकात आढळल्या त्रुटी 

वायरल झालेला फलक आणि ठिकाण जुळत असले तरी फोटोमधील बारकावे पाहिल्यानंतर त्यात अनेक त्रुटी आढळून येतात. तसेच तिथे विचारणा केली असता गेल्या काही दिवसांपासून त्या ठिकाणी कोणताच फलक लागला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा खोडसाळपणा मागे कोण आहे याचा शोध वाकड पोलीस घेत आहेत. केवळ प्रकाश झोतात येण्यासाठी हे कृत्य केले आहे, हेदेखील पोलिसांना तपासावे लागणार आहे. सध्या तरी या फलकाची जोरदार चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -