घरपालघरबोईसरमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, व्यापाऱ्यांनी दोघींना केले पोलिसांच्या स्वाधीन

बोईसरमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, व्यापाऱ्यांनी दोघींना केले पोलिसांच्या स्वाधीन

Subscribe

मनोर : बोईसर शहरातील भाजी मंडईत बनावट नोटा चालविणाऱ्या रॅकेटचा स्थानिक व्यापाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. त्यांनी वेळीच समयसूचकता दाखवत दोघींना रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. याचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

बोईसर शहरात यापूर्वी देखील असे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मात्र, त्याला कायमस्वरुपी पायबंद बसलेला नाही. प्रशासनाचा कसलाही धाक नसल्यानेच समाजकंटक सातत्याने बनावट नोटा छापून बाजारात चालवत आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. बोईसरमध्ये काल, रविवारी असाच प्रकार समोर आला. शहरातील भाजी मंडईतील व्यापाऱ्यांना एका महिलेने 100 रुपयांच्या बनावट नोटा दिल्या. त्यापैकी एका महिला दुकानदाराला संशय आला. तिने आपल्याकडील 100 रुपयांची नोट तपासली असता ती नोटा बनावट असल्याचे लक्षात आले. तिला त्या महिलेने 100 रुपयांच्या दोन नोटा दिल्या होत्या. ही गोष्ट वार्‍यासारखी मंडईत पसरली. त्यानंतर सर्वांनी आपल्याकडील पैसे तपासले, तेव्हा अनेकांना त्या महिलेने 100 रुपयांच्या बनावट नोटा दिल्याचे उघड झाले. या 100 रुपयाच्या नोटेवर महात्मा गांधी यांचे छायाचित्र (वॉटरमार्क) नव्हते.

- Advertisement -

हेही वाचा – गौरवास्पद! भारताला मिळाले दोन ऑस्कर पुरस्कार, नाटू नाटू गाणं ठरलं बेस्ट ओरिजिनल साँग

त्यानंतर सर्व व्यापाऱ्यांनी त्या महिलेचा शोध सुरू केला. ही महिला शहरातील यशपद्मा या बिल्डिंगमध्ये गेल्याची माहिती त्यांना मिळाली. ते तिथे गेले असता, ती महिला, तिची 19 वर्षीय मुलगी आणि तिचा मुलगा असल्याचे आढळले. त्या महिलेची झडती घेतली असता, तिच्याकडे 10 रुपयांच्या आणखी बनावट नोटा मिळाल्या. त्यानंतर लोकांनी त्यांना बोईसर स्टेशनजवळील पोलीस चौकीत नेले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. तिने शंभर रुपयाच्या नोटेची रंगीत झेरॉक्स काढली होती, असे सांगण्यात येते.

- Advertisement -

या बनावट नोटांचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत? यामागचा मास्टरमाईंड कोण आहे? या रॅकेटमागे कोणी बडी हस्ती आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा – हिटलरला लाज वाटेल अशा पद्धतीचे… ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -