घरठाणेकल्याणमध्ये बनावट मद्याचा साठा जप्त, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

कल्याणमध्ये बनावट मद्याचा साठा जप्त, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Subscribe

कल्याण –  मुंबई व उपनगरात स्वतःच्या मालकीची वाईन शॉप चालविणाऱ्या दुकान मालक आपल्या बीएमडब्ल्यू या महागड्या गाडीत बनावट मद्याचा साठा तसेच गोदाममध्ये विविध २९१ बॉक्स दारू उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकीत उघड केले आहे. ५६,७५,६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने कल्याण शहरात काही वाईन शॉपमध्ये बनावट कंपनीच्या नावाने विक्री होत असल्याचे या अनुषंगाने बोलले जात आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग व भरारी पथकाने कारवाईचा बडगा उचलत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर प्रमुख सूत्रधार बीएमडब्ल्यू गाडीचा वाईन शॉप चालवणारा दीपक जियांदराम जयसिंधानी हा मालक मात्र फरार झाला आहे. कल्याण जवळील पडघा रोडवर असलेल्या देवरूंग या ठिकाणी दमण व हरियाणा राज्य निर्मिती महाराष्ट्र राज्यातील बनावट मद्याचा २६६ बॉक्स या गोदामातून छापा टाकत जप्त केले आहेत. तसेच रिलायन्स मार्केट जवळील स्कायविला संकुलनात पार्किंग मध्ये उभी असणाऱ्या बीएमडब्ल्यू गाडीची तपासणी केली असता या गाडीतून २५ मद्यांचे बॉक्स राज्य उत्पादन शुल्क विभागाला आढळून आले.

- Advertisement -

दमन येथून या महागड्या गाडीतून गोणीमध्ये जुने कपडे भरत बनावट दारूची वाहतूक दीपक जयसिंधानी करीत होता. गाडीवर कोणाचाही संशय येणार नसल्याने तो शहरातील अनेक वाईन शॉप मध्ये या बनावटी मद्यांचे बॉक्स पुरवीत असल्याचे आता निष्पन्न होऊ लागले आहे. दमण व हरियाणा या राज्यातील ५२ बॉक्स, महाराष्ट्र राज्यातील बनावट विदेशी मद्य व बियर २३९ बॉक्स असे एकूण १३८४५ बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. बनावट मद्याची वाहतूक करणाऱ्या जयसिंधानी यांचे मुंबई सह उपनगरात वाईन शॉप अस्तित्वात आहे. देवरुंग येथील वाईन शॉपला सिल करीत विदेशी बनावट मद्य पोलिसांनी जप्त करीत जयसिंधानी याचा पोलीस तपास करीत आहेत. या कारवाईत संदीप रामचंद्र दावानी राहणार उल्हासनगर, हनुमंत दत्तू ठाणगे राहणार देवरुंग यांना पोलिसांनी अटक केली आहे.

तर मद्य पुरवठा करणारा दीपक जयसिंधानी हा फरार झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कल्याण निरीक्षक संजय भोसले, नंदकिशोर मोरे, अनिल पवार ,राजेंद्र शिरसाट, संजय गायकवाड, पूजा रेखे, मनोज निकम, कांतीलाल कवडे, सोमनाथ कोठुळे, विजय पाटील, तसेच जवान सर्वश्री अजमत तडवी, योगेश गायकवाड, रोहन मार्टिस, नितीन लोखंडे, गणेश पाटील ,रुपेश खेमनर, अर्जुन कापडे, सचिन चव्हाण, शैलेश कांबळे यांनी प्रत्यक्षात यामध्ये छापा टाकीत सहभाग नोंदविला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय भोसले करीत आहेत.

- Advertisement -

कल्याणात बनावट दारू?

कल्याण शहरातील काही वाईन शॉप दुकानात बनावट दारूची विक्री होत असल्याची चर्चा ग्राहकांमध्ये सुरू असताना कल्याण शहरातील वाईन शॉप ला बीएमडब्ल्यू चा मालक जयसिंधानी हाच साठा पुरवीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कल्याण शहर व आजूबाजूच्या परिसरातील बियर बार तसेच अनाधिकृत धाब्यांवर देखील मोठ्या प्रमाणात या विदेशी बनावट मद्यांचा साठा उपलब्ध करण्यात येत असल्याच्या तक्रारी यापूर्वी करण्यात आल्या असताना याकडे कायम दुर्लक्ष केले गेले होते. धाब्यांवर मोठ्या प्रमाणात या बनावट मद्याला अव्वाचा सव्वा भाव घेत विक्री केली जात आहे.

दारू उत्पादन शुल्क विभागाने वाईन शॉप चालवणारा मालकच बनावट दारूची विक्री करीत असल्याचे चौकशीत उघड झाल्याने एक्साईज विभागही या घटनेने अचंबित झाला आहे. अनेक वाईन शॉप व धाब्यांवर आज पण एक्साईज डिपार्टमेंट छापा टाकल्यास विक्रीसाठी ठेवलेला बनावट मध्यांचा साठा उपलब्ध होईल अशी माहिती एका संबंधितांने दिली आहे.


हेही वाचा : मला पंतप्रधान करा, 370 कलम रद्द करतो; केसरकरांनी सांगितला मोदींचा जुना किस्सा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -