Eco friendly bappa Competition
घर क्राइम मुंबईत 'बनावट' मनी लाँड्रिंगचा पर्दाफाश, तरुणीने गमावले लाखो रुपये, नेमकं प्रकरण काय?

मुंबईत ‘बनावट’ मनी लाँड्रिंगचा पर्दाफाश, तरुणीने गमावले लाखो रुपये, नेमकं प्रकरण काय?

Subscribe

Fake Money Laundering | तरुणीला याबाबत थोडाफार संशय येऊ लागला. त्यामुळे तिने याप्रकरणी तिच्या मित्रांना कळवलं. मित्रांनी या प्रकरणात फसवणूक होत असल्याचं स्पष्ट केल्यानंतर तरुणीने टिळकनगर पोलीस ठाणे गाठलं. 

Cyber Crime in Mumba | मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये (Cyber Crime) वाढ झाली आहे. विविध युक्ती आखून अनेकांना जाळ्यात ओढलं जातं. असाच एक नवा प्रकार समोर आला आहे. विविध शासकीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवत मुंबईतील तरुणीला तब्बल लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. दरम्यान, आपण फसवले गेलो असल्याचं कळताच तरुणीने टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

निशा (नाव बदलेले) नावाची २८ वर्षीय तरुणी चेंबूर परिसरात राहत असून बीकेसी येथील एका खाजगी कंपनीत मॅनेजमेंट सल्लागार म्हणून काम करते. ३१ डिसेंबरला तिला पूजा शर्मा या महिलेचा फोन आला होता. पूजा शर्माने तिच्यावर चुकीचे आरोप लावले. बेकायदा पार्सल पाठवून मनी लाँड्रिंगचा करत असल्याचा आरोप पूजाने निशावर केला. तसंच निशाविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार दाखल असल्याचंही पूजाने सांगितलं. याप्रकरणातून बाहेर पडण्यासाठी पूजा शर्मानेच संताजी घोरपडेचे निशाशी बोलणे करून दिले. संताजी सायबर सेलमध्ये कामाला असल्याचे भासवण्यात आले. जयकुमार नामक व्यक्तीने केलेल्या मनी लाँड्रिंगचा प्रकरणात निशाचा सहभाग असल्याचा दावा संताजी घोरपडे याने केला. तसंच, या प्रकरणात तिला अटकही होऊ शकते अशी भीती निर्माण केली. त्यामुळे निशा घाबरली. काही वेळाने आशुोतष नामक व्यक्तीने फोन केला. आशुतोषने आपण सरकारी अभियोक्ता असल्याचे सांगत तिला मदतीचे आश्वासन दिले.

- Advertisement -

हेही वाचा धक्कादायक! पुण्यात 100 रूपयांसाठी विद्यार्थ्याचा मनगटापासून कापला हात

शासकीय यंत्रणातील अधिकाऱ्यांकडूनच फोन येऊ लागल्याने निशा अधिक बिथरली. तिने आशुतोषची मदत घेण्याचं ठरवलं. आशुतोषने आयटी, ईडी, सायबर सेल, एनसीबी, गोरेगाव पोलीस ठाणे, मुंबई आणि दिल्ली हायकोर्ट येथील दस्तावेज बनवून नोटरी करावी लागेल, असा बनाव रचला. यासाठी त्याने पैशांची मागणी केली. संबंधित महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला ९८ हजार रुपये देऊ केले. त्यानंतर इतर कामासाठी आणखी लाखभर रुपये लागतील असं सांगितलं. मात्र, ऑनलाईन युपीआयद्वारे एवढी मोठी रक्कम जात नसल्याने त्याने बँकेमार्फत पैसे पाठवण्यास सांगितले. दरम्यान, तरुणीला याबाबत थोडाफार संशय येऊ लागला. त्यामुळे तिने याप्रकरणी तिच्या मित्रांना कळवलं. मित्रांनी या प्रकरणात फसवणूक होत असल्याचं स्पष्ट केल्यानंतर तरुणीने टिळकनगर पोलीस ठाणे गाठलं.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत दीडशे तळीरामांची झिंग पोलिसांनी उतरवली

टिळकनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही आरोपींविरुद्ध तक्रार केली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला. या गुन्ह्यांचा टिळकनगर पोलिसांसह सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरू आहे.

- Advertisment -