घरमहाराष्ट्रराधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिला?

राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिला?

Subscribe

काँग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्याची अफवा पसरवण्यात आली होती. मात्र काही वेळातच विखे पाटील यांनी बातमीचे खंडन केले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्याची अफवा पसवण्यात आली. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी गाजावाजा करत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे हा राजीनामा देण्यात आला असल्याची चर्चा होती. राधाकृष्ण विखे पाटीलांनी आपला राजीनामा हायकमांडकडे सोपवला असून लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये फिरत होत्या. मात्र प्रत्यक्ष राधाकृष्ण विखे पाटीलांनी याचे खंडन केले आहे. आपण राजीनामा दिला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता वीखे पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उठले जात होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -