पनीर खाताय, मग जरा सावधान! बनावट पनीरची होतेय विक्री; मुंबई पोलिसांचे दोन कंपन्यांवर छापे

बदलापूर आणि भिवंडीमध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन कथित बनावट पनीर उत्पादन कंपनीवर छापे टाकले. या छापेमारीनंतर मुंबई पोलिसांनी तब्बल 2000 किलो पनीर जप्त केलं. पनीर म्हणजे शाकाहारी जेवणातील प्रमुख पदार्थ आहे.

health benefits of eating paneer
बिनधास्त खा 'पनीर'

बदलापूर आणि भिवंडीमध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन कथित बनावट पनीर उत्पादन कंपनीवर छापे टाकले. या छापेमारीनंतर मुंबई पोलिसांनी तब्बल 2000 किलो पनीर जप्त केलं. पनीर म्हणजे शाकाहारी जेवणातील प्रमुख पदार्थ आहे. मात्र आता पनीरच बनावट असल्यानं खवय्यांच्या सुरक्षेंचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसंच, यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती समोर येत आहे.

बदलापूरमधील यशोदा ऑरगॅनिक फूड आणि भिवंडीतील दिशा डायरी या दोन कारखान्यांवर छापे टाकले. या दोन्ही कारखान्यांमधून पामतेल, दूध पावडर आणि पनीरने भरलेले 95 कंटेनर जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी 7 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली असून, या कंपनीतून 2131 किलो उत्पादन जप्त करण्यात आल्याचं समजतं. विशेष म्हणजे या कंपन्यांमधून अनेक उपनगरे, दक्षिण मुंबईतील अनेक रेस्टॉरंट्स आणि भोजनालयांना वर्षभरापासून हे बनावट पनीर पुरवलं जात असल्याची माहिती मिळते.

मिळालेल्या माहितीनुसार, हे बनावट पनीर 200-250 रुपयांना विकले जात होते. ते तयार करण्यासाठी दुधाऐवजी दुधाची पावडर आणि पाम तेल वापरत होते. यामध्ये एका कारखान्यात दररोज सुमारे 2000 किलो पनीर विकले जात होते.

याआधी पोलिसांनी 6 मे रोजी चेंबूरमध्ये एक टेम्पो ताब्यात घेतला आणि 631 किलो बनावट पनीर जप्त केलं होतं. त्यांनी पनीरचे नमुने घेतले त्या टेम्पोमधून ते चेंबूर येथील एका डेअरीत नेले जाणार होते. मिळालेल्या माहितीनुसार, जप्त केलेले नमुने अन्न आणि औषध प्रशासनाकडे (FDA ) तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांच्या अहवालात ते बनावट होते, त्यात तेल होते आणि ते खाण्यायोग्य नव्हते अशी माहिती समोर आली.

या अहवालानंतर, FDA अधिकाऱ्याने बुधवारी चेंबूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक) 272(विक्रीसाठी अन्न किंवा पेयामध्ये भेसळ) आणि 273 (हानीकारक अन्न किंवा पेय विक्री) या अंतर्गत एफआयआर दाखल केला. यानंतर क्राइम ब्रँच कंट्रोल युनिटने यासंबंधी तपास हाती घेतला.


हेही वाचा – पुणे रेल्वे स्थानकावर आढळली बॉम्बसदृश्य वस्तू, वस्तू स्फोटक…