घरमहाराष्ट्रपिस्तुल विक्रीची आवड पडली महागात

पिस्तुल विक्रीची आवड पडली महागात

Subscribe

पिस्तुल विक्रीची आवड असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. योगेश दौंडकर असे या आरोपीचे नाव असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शौक बडी चिंज होती है… अस म्हणतात ते खरचं आहे. बऱ्याच व्यक्तींना कोणत्याही गोष्टीची आवड असते आणि ती आवड जपण्यासाठी ते काही करु शकतात. अशीच एक घटना पुणे येथे घडल्याचे समोर आले आहे. पिस्तुलाचे आकर्षण आणि पिस्तुल विक्रीची आवड असलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल असून त्याच्याकडून सात देशी बनावटीचे पिस्तुल आणि २८ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. योगेश बाजीराव दौंडकर (३५) असे या आरोपीचे नाव असून आरोपीला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत.

नेमके काय घडले?

योगेश दौंडकर हा आरोपी उत्तर प्रदेशमधून देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन पुणे जिल्ह्यात कमी किंमतीत विकायचा. त्यातून योगेश याला पैसे मिळायचे आणि आवड पूर्ण केल्याचं समाधान देखील मिळत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. योगेश दौंडकर शेल पिंपळ येथील गावात राहायचा. मंगळवारी योगेश मोशी परिसरात पिस्तुल विकण्यासाठी येणार असल्याची खात्रेशिर माहिती गुन्हे शाखा दोनच्या पथकाला मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार मोशी परिसरातील जुना जकात नाका येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांच्या पथकाने सापळा रचला. त्या दरम्यान योगेश हा दुचाकी घेऊन पुणे नाशिक रोडवर आला. पोलिसांनी त्याला थांबवले आणि त्याची तपासणी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी योगेशकडे सात बनावटीचे पिस्तुल आणि १७ जिवंत काडतुसे आढळली. हा आरोपी देशी बनावटीचे पिस्तुल १५ ते २० हजार रुपयाला विकायचा. याप्रकरणी योगेश दौंडकर याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisement -

वाचा – एकाच आठवड्यात तिसरे पिस्तुल हस्तगत

वाचा – ISSF World Championships : ५० मीटर पिस्तुल स्पर्धेत भारताला सुवर्ण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -