घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रखरेंचे खोटे कारनामे : तुरुंगवारी टाळण्यासाठी केलेला ‘सिव्हिल’ मुक्कामाचा प्लॅन फेल; थेट...

खरेंचे खोटे कारनामे : तुरुंगवारी टाळण्यासाठी केलेला ‘सिव्हिल’ मुक्कामाचा प्लॅन फेल; थेट कारागृहात रवानगी

Subscribe

नाशिक : लाचखोर सतीश खरेनी न्यायालयीन कोठडी मिळाल्याने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात जाणे टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल होऊन मुक्काम करण्याचा फ्लॅन केला. त्यासाठी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी सेटिंग करण्यात आले होते. मात्र, भितीपोटी कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकार्‍यांनी खरेचा फ्लॅन हाणून पाडला. त्यामुळे खरेची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली.

निलंबित जिल्हा उपनिबंधक सतीश खरेला पोलीस कोठडीची मुदत संपल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी (दि.२०) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जामिनासाठी लगेच प्रतिसाद मिळणार नाही, हे माहिती असल्याने सतीश खरेने छातीत कळ आल्याचा बहाणा केला. त्यास वैद्यकीय तपासणीसाठी शनिवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

कारागृहात जाणे टाळण्यासाठी खरे थेट आयसीयूकडे गेला. काही वेळाने आपत्तीकालीन विभागात झाला. खांद्याला धरून थेट बेडवर झोपला. येथे त्याने आजारपणाचा बनाव केला. त्याने अ‍ॅडमिट करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आरोग्य विभागातील काही अधिकार्‍यांकडे सेटींग करण्यात आले होते. मात्र, कारवाईच्या भितीपोटी कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्यास कारागृहात नेण्याची परवानगी दिली. त्यामुळे त्याचा जिल्हा रुग्णालयात मुक्काम करण्याचा प्लॅन फसला. शेवटी तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वाहनात बसला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -