Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र खरेंचे खोटे कारनामे : अपहार दडपण्यासाठी पैशांबरोबरच दारु, मटणाच्या पार्ट्या

खरेंचे खोटे कारनामे : अपहार दडपण्यासाठी पैशांबरोबरच दारु, मटणाच्या पार्ट्या

Subscribe

नाशिक : जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्या लाचखोरी प्रकरणानंतर त्याचे अनेक कारणाने उघडकीस येत आहेत. जिल्ह्यातील अनेक पतसंस्थांच्या गैरव्यवहार प्रकरणात चौकशीच्या आडून खरे याने मोठी माया जमवली. पतसंस्थांमध्ये गंभीर स्वरूपाचे अपहार दडपण्यासाठी तो चक्क दारू आणि मटणाच्या पार्ट्या मागत असल्याची तक्रार तक्रारदाराने केली होती. त्याची ऑडिओ क्लिपही उपलब्ध आहे. खरे याच्याकडे न्यायदानाचे काम असताना पारदर्शक न्याय निवडा करण्याऐवजी त्याने सेटलमेंटवरच अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खरे याचे न्यायनिवाडे वादग्रस्त आणि सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत मारक ठरले आहेत.

जिल्ह्यातील पतसंस्थांच्या गैरव्यवहाराबाबत चौकशी सुरू असताना खरेकडून दारू आणि मटणाच्या पार्ट्यांची मागणी होत असल्याची धक्कादायक पुढे आली आहे. निफाड तालुक्यातील एका पतसंस्थेत सुमारे तीन कोटी रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी चौकशी दडपण्यासाठी तसेच, संस्थाचालकांना वाचवण्यासाठी खरे याला अनेकदा दारू आणि मटणाच्या पार्ट्या दिल्याचे एका तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याला संस्थेच्या एका कर्मचार्‍याने दुजोरा दिला असून खरेकडून वेळोवेळी पार्ट्यांची मागणी होत असल्याचे त्यांनी कबूल केले आहे. जिल्ह्यातील पतसंस्थांच्या कारभाराची चौकशी तसेच लेखा परीक्षण आणि कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधक सतीश खरे याला होते.

- Advertisement -

अनेक छोट्या मोठ्या संस्थांचे न्यायनिवाडे सतीश खरेसमोर चालत होते. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला दिवाणी न्यायालयाचा दर्जा असल्याने सतीश खरे हा न्यायाधीशाच्या भूमिकेत होता. असे असताना त्याने कधीही न्याय निवाड्यांमध्ये पारदर्शकता ठेवली नाही. अनेक निर्णयांमुळे खरे याची भूमिका वादग्रस्त ठरली होती. मात्र, न्यायालयाचा दर्जा असल्याने त्याच्याविरुद्ध उघडपणे बोलण्याची किंवा विरोध करण्याची हिंमत कोणी दाखवली नाही. बहुतांश प्रकरणांमध्ये खरे याने सेटलमेंट करून मोठ्या प्रमाणावर स्वतःचे उखळ पांढरे केल्याचे बोलले जाते आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -